esakal | मुंबईला ५६ ऐवजी २५ डॉक्टर प्रतिनियुक्तीवर, अंबाजोगाईत मुंदडांचे धरणे आंदोलन मागे  
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५६ डॉक्टरांना शुक्रवारी (ता.२९) मुंबई येथे प्रतिनियुक्तीचे आदेश काढले होते.  डॉक्टरांच्या प्रतिनियुक्तीबाबत श्री. मुंदडा यांची डॉ. लहाने यांच्याशी भ्रमणध्वणीवर चर्चा झाली.

मुंबईला ५६ ऐवजी २५ डॉक्टर प्रतिनियुक्तीवर, अंबाजोगाईत मुंदडांचे धरणे आंदोलन मागे  

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंबाजोगाई (जि. बीड) - वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. टी. पी. लहाने यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर स्वारातीमधील २५ डॉक्टरांना प्रतिनियुक्तीवर मुंबईला पाठवण्याचे आश्वासन मिळाल्याने नंदकिशोर मुंदडा यांनी शनिवारी (ता.३०) सकाळी अधिष्ठाता कार्यालयासमोर सुरू केलेले धरणे आंदोलन सायंकाळी मागे घेतले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५६ डॉक्टरांना शुक्रवारी (ता.२९) मुंबई येथे प्रतिनियुक्तीचे आदेश काढले होते. येथील रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी डॉक्टरांची प्रतिनियुक्ती करायची असेल तर स्वारातीमध्ये पर्यायी डॉक्टरांची व्यवस्था करा या मागणीसाठी शनिवारी (ता.३०) नंदकिशोर मुंदडा यांनी अधिष्ठाता कार्यालयासमोर आपल्या कार्यकर्त्यांसह धरणे आंदोलन सुरू केले होते. डॉक्टरांच्या प्रतिनियुक्तीबाबत श्री. मुंदडा यांची डॉ. लहाने यांच्याशी भ्रमणध्वणीवर चर्चा झाली.

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा..

त्यानंतर अधिष्ठाता यांच्याशीही चर्चा झाली. त्यात २८ डॉक्टरांना प्रतिनियुक्तीवर पाठवण्याचे आश्वासन मिळाले; परंतु वैद्यकीय कारणास्तव काही डॉक्टरांची प्रतिनियुक्ती रद्द झाली. अखेर २५ डॉक्टरांना प्रतिनियुक्तीवर मुंबईला पाठवण्यात येत आहे. या निर्णयानंतर शनिवारी रात्रीच प्रतिनियुक्ती झालेले निवासी डॉक्टर मुंबईला रवाना होणार होते.