accident
accident

नांदेड-नागपूर महामार्गावर अपघातात 25 जण जखमी

नांदेड : नांदेड-नागपूर महामार्गावर अपघात झाला असून, या अपघातात २५ च्यावर जखमी झाले आहेत. हा आपघात सोमवारी (ता. तीन) सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास झाला.

नांदेड-नागपूर महामार्गावर सोमवारी आसना पुलाजवळ सकाळी सहा वाजताच्या सुमारास भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली. यात बसमधील २५ च्यावर प्रवासी जखमी झाल्याचा अंदाज आहे. यात बस चालक गंभीर जखमी झाला असून सर्व जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक वृत्त असे, की नांदेड-नागपूर महामार्गावर अपघात झाला असून भरधाव वेगातील ट्रक एमएच २४ एबी ६९७० नांदेडमार्गे जात असताना नांदेडहून येणाऱ्या नांदेड पुसद एमएच २० बिएल १७४० बसला जोरदार धडक दिली. यात बसला ट्रकने घासत घेऊन गेल्यामुळे बसमधील २५ च्यावर प्रवासी जखमी झाल्याचा अंदाज आहे.

यावेळी बस रोडच्या खाली गेली. गाडीमध्ये प्रवास करणारे जास्तीत जास्त शासकीय नोकरी नोकरीसाठी जात असताना अचानक झालेल्या अपघातामुळे गाडीमधील सीट  अक्षरशः तुटून पडल्या आहेत. गाडीमध्ये बरेच रक्त सांडले असून अनेकांच्या डोक्याला मार आहे. तर अनेकांचे हात पाय फॅक्चर झाले आहेत. यात बसचालक  गंभीर जखमी असून २५ च्या वर प्रवासी जखमी झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.  घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबक गायकवाड, वैद्य, साळुंखे यांच्यासह अर्धापूर पोलीस व महामार्ग पोलीस यांनी तातडीने भेट देऊन जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले. घटना घडताच ट्रक चालक मात्र फरार झाला.

या आपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची नावे पुढील प्रमाणे. अविनाश थावरा राठोड (वय 30 दिंडाळा. ता. उमरखेड), श्रीकृष्ण श्यामराव कवडे (वय 45 रा. चिंचगव्हाण ता हादगाव ), दयानंद मरिबा गजभारे (वय 33 रा. धनेगाव), राजाबाई परमेश्वर जाधव (वय 50 रा. हादगाव ), तुकाराम उमला जाधव (वय 48 रा केरूर ता बिलोली),) विजय विश्वान इंगोले  (वय 43 रा.नांदेड ), प्रवीण भगवानरा ऐडके(वय 31रा नांदेड ),बापुराव गणपती पाटील (वय 50 रा बेलखेड ता उमरखेड ),पंडित किशन नरवाडे (वय 53 बदलापूर, कल्याण ),संभाजी गुंडे( रा अंबुलगा),अशोक बाळभाऊ नालमवार  (वय 63 रा गजानन मंदिर नांदेड ), अभिजित अशोक नालमवार  (वय 30 गजानन मंदिर नांदेड ), सय्यद सैदु सय्यद महेबूब (वय 52), कविता संतोष मुळे  (वय 28 रा अरेगाव ता पुसद), संतोष कोंडबाराव मुळे  (रा आरेगाव ता पुसद), नंदकिशोर विश्वनाथ महाजन  (वय 27 रा हादगाव ), पंकज अर्जुन पवार  (वय 27 रा दराटी ता उमरखेड), रिजवानबी सय्यद शेख याकुब  (वय 22 रा हडसनी ता माहूर),भाऊराव धोंडबाराव मस्के(वय 42 वसंतनगर नांदेड ), चांगुना माधवराव लहाने(वय 47 रा.श्रीनगर नांदेड), जगदीश चंद्रकांत मामीडवार (वय 55 रा जैन मंदिर नांदेड ), सचिन ओमप्रकाश विगानिया (वय 29 रा नाशिक ), शंकरराव गंगाराम काळे  (वय 40 रा मोहनदरी ता उमरखेड ),काशिनाथ माधवराव चव्हाण  (वय 59 हादगाव) हे जखमी झाले असून नांदेड येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com