नोटाबंदीनंतर मराठवाड्यात 25 हजार नवीन पॅनकार्ड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - नोटाबंदीच्या निर्णयानंतर बॅंक आणि अन्य व्यवहारांसाठी पॅनकार्ड अनिवार्य झाले असून, गेल्या दोन महिन्यांत मराठवाड्यात तब्बल 25 ते 28 हजार नव्या पॅनकार्डची भर पडली आहे. नोटाबंदीनंतर अनेक बचत खात्यांमध्ये संशयित व्यवहार झाले. पॅनकार्ड क्रमांकाशिवाय हे व्यवहार शोधणे कठीण होते. त्यामुळे पॅनकार्डची संख्या जास्तीत जास्त वाढण्यासाठी अर्थ खाते प्रयत्नशील आहे.

दरवर्षी पॅनकार्डधारकांच्या संख्येत आठ ते दहा टक्‍के भर पडते. मात्र, नोटाबंदीनंतर मोठ्या व्यवहारांसाठी पॅनकार्ड क्रमांक बंधनकारक करण्यात आले. त्यामुळे बॅंकेत खाते उघडण्यापासून नवीन पॅनकार्डसाठी अर्जदारांच्या संख्येत वाढ होत आहे. मराठवाड्यात पॅनकार्डधारकांची संख्या पावणेतीन लाख एवढी आहे. आता यात पंधरा ते वीस टक्‍के नवीन पॅनकार्डधारकांची भर पडली आहे.

Web Title: 25 thousand new PAN card