औरंगाबाद: सेंट्रल बसस्थानाकासमोर 25 ट्रक कचरा पेटवला

बालाजी कोंडे
मंगळवार, 17 एप्रिल 2018

औरंगाबाद - शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याऐवजी त्याची जाळपोळ करण्याचे प्रताप अद्यापही थांबलेले नाहीत. सेंट्रल बसस्टँड या गजबजलेल्या परिसरात तब्बल 25 ट्रक कचरा पटवून देण्यात आल्याने परिसर धुरात हरवला होता. 

शहरातील कचराकोंडी फोडण्यात अपयशी ठरलेल्या महापालिकेला कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या वाटा दोन महिन्यांनानंतरही सापडलेल्या नाहीत. गजबजलेल्या सेंट्रल बस स्थानकालगत असलेल्या टॅक्सी स्टँडच्या मोकळ्या जागेत तब्बल 25 ट्रक कचरा आणून टाकण्यात आला. या कचऱ्याला आग लावण्यात आल्याने परिसरातील बस स्थानक, मिल कॉर्नर आणि समर्थनागरचा भाग धुरात बुडाला. 

आगीने रौद्र रूप धारण केल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.

Web Title: 25 trucks garbage in front of the central bus

टॅग्स