जीएसटीनंतर वाढले २५.९ टक्‍के करदाते

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

विभागात ३२ हजार ९१२ नवे करदात, दोन हजार २४८ कोटींचा मिळाला महसूल
औरंगाबाद - राज्यात जीएसटी आल्यानंतर करदात्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. यात औरंगाबाद विभागातही जीएसटीनंतर औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांत सहा हजार ७८९ नवे व्यापारी जीएसटीला जोडले गेले. व्हॅट असतानाच्या तुलनेत ही वाढ २५.९ टक्‍के झाली असून, दोन हजार २४८ कोटींचा महसूल वर्षभरात या विभागाला मिळाला आहे, अशी माहिती जीएसटी कार्यालयातर्फे शनिवारी (ता.३०) ‘सकाळ’ला देण्यात आली. 

जीएसटीपूर्वी तिन्ही जिल्ह्यांत व्हॅट भरणारे २६ हजार १२३ व्यापारी होते. जीएसटी लागू झाल्यानंतर टॅक्‍स बुडविणाऱ्यांची संख्या घटली आणि व्यवहारातही पारदर्शकता आली. राज्यात वस्तू आणि सेवाकराची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आल्यामुळे जीएसटीमध्ये नोंदणी करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली. औरंगाबाद विभागात जीएसटी कर्मचाऱ्यांनी हेल्प डेक्‍स आणि व्यापाऱ्यांसाठी जनजागृती शिबिरे घेतल्याने जीएसटीची अंमलबजावणी योग्यरीत्या करता आली. यासह व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडण्यासाठी विभागाने पुढाकार घेतला.

महसुलावर परिणाम
जीएसटी लागू झाल्यानंतर राज्य वस्तू व सेवाकर विभागाकडे असलेल्या दीड कोटीच्या वरील उलाढाल करणाऱ्यांपैकी ५० टक्‍के करदाते केंद्रीय वस्तू व सेवाकर (सीजीएसटी) कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले. ५० टक्‍के राज्य वस्तू व सेवाकर विभागाकडे आहेत. यासह दीड कोटीच्या आत व्यवहार असलेल्या करदात्यांपैकी ९० टक्‍के करदाते हे राज्य वस्तू व सेवाकर विभागाकडे आहेत. तर दहा टक्‍के करदाते केंद्रीय वस्तू व सेवाकर (सीजीएसटी) कार्यालयाकडे वर्ग झाले आहेत. यामुळे महसुलावर परिणाम झाला आहे. जीएसटी लागू करण्यापूर्वी दोन हजार ५३६ कोटी रुपयांचा महसूल आला होता. तो जीएसटी लागू झाल्यानंतर दोन हजार २४८ कोटींवर आला. 

Web Title: 25.9 percent taxpayer increase after GST