हिंगोली जिल्ह्यात २, ८७२. ६२ लाखाच्या पाणी टंचाई कृती आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता

file photo
file photo

हिंगोली : जिल्ह्यात ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई भासू नये यासाठी जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने सादर केलेल्या जानेवारी ते जून २०- २१ कृती आराखड्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी मंजुरी दिली आहे.

जिल्ह्यात यंदा सरासरी १०० टक्के पर्जन्यमान झाले. त्यामुळे जिल्ह्यातील इसापुर, सिद्धेश्वर जलाशयात भरपूर पाणीसाठा आहे. याशिवाय जलसंधारण अंतर्गत तयार केलेले तलाव देखील पुरेपूर भरले होते. त्यामुळे टंचाई भासणार नाही. परंतू अनेक गावात कायमस्वरूपी नळ पाणीपुरवठा योजना नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने संभाव्य  जानेवारी ते जून २०-२१ पाणी टंचाई लक्षात घेता २,८७२. ६२ लाखाचा टंचाई कृती आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला होता. त्या आराखड्यास जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी ( ता. १८) फेब्रुवारी मंजुरी दिली आहे. यामध्ये जानेवारी ते मार्च २,४३५. ४८लाख तर एप्रिल ते जून यासाठी ४३७. १४ लाख मंजूर झाले आहेत.

३०८ गावात ३२१ तात्पुरती पाणी पूरक योजना राबविली जाणार असून यासाठी १,७२६. ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली तर ६१ गावात ६१ नळ योजना दुरुस्ती साठी ३०८.५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच विंधन विहीर विशेष दुरुस्ती दोन गावात १९उपाययोजना केल्या जाणार असून यासाठी १७.४० लाख रुपयांची मंजुरी मिळाली आहे. तर ३३७ गावात नवीन विंधन विहीर घेण्यासाठी ५११ कामासाठी ३१६. ८२ लाख मंजूर झाले आहेत. तसेच खाजगी विहीर अधिग्रहण करण्यासाठी ६६ गावात ९६ कामे राबविण्यात येणार आहेत. तर २७९ गावात ४९१ कामावर उपाय योजना करण्यासाठी ३१८. ६ लाख मजूर केले आहेत. 

याशिवाय विहीर खोलीकरण, गाळ काढण्यासाठी १४ गावात १४ कामासाठी ४७२४ लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली. या व्यतिरिक्त बुडक्या घेणे, टँकरने पाणी पुरवठा करणे आदी कामांना देखील मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार ग्रामीण पाणी पुरवठा विभागीय कार्यालया मार्फत संबधीत उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंचायत समिती यांना( ता. २४) फेब्रुवारी रोजी पुढील कारवाई करण्यासाठी पाणी टंचाई आराखडा तयार करण्यासाठी पत्र सादर केले असून तशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता पंचायत समित्यांनी आपल्या तालुक्यात कोणत्या गावात पाणी टंचाई आहे त्याची यादी करून त्याप्रमाणे अहवाल सादर केल्यास त्यानुसार त्या त्या गावात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपाय योजना केल्या जाणार आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com