विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शस्त्रास्त्रांसह तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

30 सप्टेंबरला रात्री 8.30च्या सुमारास केलेल्या कारवाईत उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एक बंदूक, तलवार, खंजर असे प्राणघातक शस्त्रे जप्त केले आहेत.

नांदेड : सर्वत्र विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच पोलिस प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना राबविली आहे. दरम्यान 30 सप्टेंबरला रात्री 8.30च्या सुमारास केलेल्या कारवाईत उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एक बंदूक, तलवार, खंजर असे प्राणघातक शस्त्रे जप्त केले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वत्र पोलिस दलाच्या वतीने कारवाई सत्र सुरू करण्यात आले आहे. ३० सप्टेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अप्पर पोलिस अधीक्षक दत्तराम राठोड यांच्या आदेशानुसार इतवारा उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील, पो.नि. प्रदीप काकडे, यांच्या पथकाने बाफना टी-पॉर्इंट येथे घटनास्थळी पोहचून तिघांना ताब्यात घेतले. यामध्ये आरोपी तेजासिंग टप्पेवाले, आकाशसिंग लांगरी व आकाश लुळे यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे एक बंदुक, तलवार व खंजर यासारखे प्राणघातक शस्त्रे आढळून आली असून ती पोलिसांनी जप्त केली.

या पथकात शंकर नलबे, महम्मद गौस, इतवारा डी.बी.चे मांडवकर, हबीब चाऊस, शेख खाजा, माने या पोलिस कर्मचाNयांचा समावेश होता. याप्रकरणी वृत्त लिहीपर्यंत इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3 arrested for carrying weapons at Nanded