बीडमधील सैराट खुनी 'असा' पकडला

दत्ता देशमुख
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

पोलिस अधीक्षकांचे बॅचमेंट कामी आले 
बीड ऑनर किलींगमध्ये मुख्य आरोपी पकडले
सैराट आरोपींची तिरुपतीवारी
बडनेरला आवळल्या मुसक्या

बीड : राज्यभर गाजलेला बीडमधील सैराट खून प्रकरणातील आरोपीला पकडण्यात आज पोलिसांना यश आले. गुन्ह्याच्या तपासात पोलिस यंत्रणेला जसे गुप्तवार्ता, खबरे, गुप्त बातमीदार माहिती पुरवितात आणि एखाद्या आरोपीच्या मुसक्या आवळणे सोपे जाते. तसे, येथील राज्यभर गाजलेल्या सुमित वाघमारे ऑनर किलींग प्रकरणात पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या बॅचमेंटची मदत झाली.

नागपूर विभागात त्यांचे चार बॅचमेंट आहेत. या सर्वांना त्यांनी या गुन्ह्याची माहिती दिली. नागपूर येथील एक बॅचमेंट श्री. अमोघगावकर हे नागपूर रेल्वे पोलिसमध्ये पोलिस अधीक्षक अधीक्षक असून त्यांच्यामुळे या प्रकरणातील मुख्य आरोपी बालाजी लांडगे व संकेत वाघ या दोघांच्या मुसक्या आवळणे बीड पोलिसांना शक्य झाले. बीडच्या पथकाने या दोघांना सोमवार आणि मंगळवारच्या मध्यरात्री बडनेर रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली.

येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या सुमित वाघचे त्याचीच वर्गमैत्रिण भाग्यश्रीसोबत प्रेमसंबंध जुळले. त्यातून त्यांनी प्रेमविवाह केला. मात्र, यामुळे भाग्यश्रीचा भाऊ बालाजी लांडगेच्या मनात राग होता. बुधवारी (ता. 19) भाग्यश्री व सुमित अभियांत्रिकी परीक्षेचा पेपर देण्यासाठी गेले असता आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समोरील पार्किंगमध्ये संकेत वाघ हा पांढऱ्या रंगाची कार घेऊन थांबला होता. कारमध्ये भाग्यश्रीचा भाऊ बालाजी शेषकुमार लांडगे बसलेला होता. परीक्षा संपवून भाग्यश्री व सुमित घरी परत जात असताना बालाजी लांडगे व संकेत वाघ त्यांचेकडे पळत आले. बालाजी लांडगे याने याने त्याच्या जवळील धारधार शस्त्राने सुमितच्या छातीवर आणि पोटावर वार करुन भाग्यश्री समोरच पती सुमित वाघमारेचा खुन केला. त्यानंतर दोघे पळून गेले होते. 

सैराट आरोपींची तिरुपतीवारी; बडनेरला आवळल्या मुसक्या
घटनेनंतर पोलिसांची पाच पथके आरोपींचा शोध घेत होती. घटनेच्यावेळी वापरलेली कार बीडमध्ये सोडून मुख्य आरोपी बालाजी लांडगे आणि संकेत वाघ या बस आणि रेल्वेने अहमदनगर, पुणे, तिरुपती, विशाखापट्टणम, नागपूर, अकोला व अमरावती आदी या सहा दिवसांत प्रवास केले. पोलिसांनी त्यांना बडनेर (जि. अमरावती) रेल्वे स्थानकातून अटक केली. पोलिसांच्या पथकानेही औरंगाबाद, पुणे, लातूर, अहमदनगर आदी भागांत आरेापींचा माग काढला. दरम्यान, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी शोधपत्रिका काढून सर्व ठाण्यांना पाठविली होती. पण, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांचे चार बॅचमेंट नागपूर भागात बड्या हुद्द्यावर आहेत. यातील अमोघकर हे रेल्वेत पोलिस अधीक्षक आहेत. या सर्वांना पोलिस अधीक्षकांनी मोबाईलवरुन संपर्क साधला हेाता. यात अमोघकर यांची आरोपींपर्यंत पोचण्यास मदत झाली. आरोपींना न्यायायलयासमोर उभा करण्यात येणार आहे. या प्रकरणात कट रचणारा आणि आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्या कृष्णा रवींद्र क्षीरसागर यास सोमवारी पहाटे बीडमध्ये अटक केली होती. त्यास 28 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: 3 Arrested In Sumit Waghmare Honor Killing Case Police Trapped