बीड : माजलगावजवळ कार झाडाला धडकून 3 ठार 

पांडुरंग उगले 
शनिवार, 15 डिसेंबर 2018

वरील तिन्ही व्यापारी हे इंदौर येथून बीड येथील व्यापाऱ्यांकडे आलेले होते. दिवसभर त्यांची भेट घेऊन रात्री मुक्कामासाठी लातूर येथे जात होते. गढी, माजलगाव मार्गे राष्ट्रीय महामार्ग २२२ वरून जात असताना त्यांची गाडी (क्रमांक एम.पी. ०९ पी.पी. ४६८३)  टाकरवन फाट्याजवळ आली असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगात असलेली कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली.

माजलगाव (जि. बीड) : भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून गाडीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. हि घटना शुक्रवारी (ता.१४) रात्री १० वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील टाकरवन फाट्याजवळ घडली. सुरेश हरयानी, हेमंत राजपूत, रोहित (सर्व राहणार इंदौर, मध्यप्रदेश) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे असून ते कपड्याचे व्यापारी आहेत.

वरील तिन्ही व्यापारी हे इंदौर येथून बीड येथील व्यापाऱ्यांकडे आलेले होते. दिवसभर त्यांची भेट घेऊन रात्री मुक्कामासाठी लातूर येथे जात होते. गढी, माजलगाव मार्गे राष्ट्रीय महामार्ग २२२ वरून जात असताना त्यांची गाडी (क्रमांक एम.पी. ०९ पी.पी. ४६८३)  टाकरवन फाट्याजवळ आली असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगात असलेली कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली.

यात गाडीतील तिन्ही व्यापारी जागीच ठार झाले. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली असता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा तिन्ही मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. अपघाताची माहिती मयत व्यापाऱ्यांच्या नातेवाईकांना दिली असून ते माजलगावकडे रवाना झाले आहेत.

Web Title: 3 dead in accident near Majalgaon