माजलगाव तालुक्यात पावसाने घेतला तिघांचा बळी

कमलेश जाब्रस
शनिवार, 8 जून 2019

माजलगाव (जि. बीड) : शहरासह तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे घरांची पडझड झाली तर झाडे उन्मळून पडली आहेत.विज अंगावर पडल्याने दोघांचा तर भिंत अंगावर कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ता.7 रात्री घडली आहे. 

यावर्षी मृगणक्षत्रात पावसाने हजेरी लावली आहे. तालुक्यात काहिभागात जोरदार तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. नागडगाव येथे शेतातून परतत असताना अंजली खामकर वय 25 वर्षे या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर महातपुरी येथे पांडुरंग खामकर वय 30 वर्षे यांचा देखील विज कोसळून मृत्यू झाला तर शहरातील फुले नगर भागात आश्रबी सय्यद गणी वय 60 वर्षे या महिलेचा अंगावर भिंत कोसळल्याने मृत्यू झाला आहे. धरण कार्यक्षेत्रात 51 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3 dies due to rain in Majalgaon