खून प्रकरणात तिघांना दहा वर्षांची शिक्षा 

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 26 जून 2019

नांदेड : वाद सोडविण्यासाठी गेलेल्या युवकाचा खून करणाऱ्या तिघांना येथील जिल्हा न्यायाधीश (पहिले) एस. एस. खरात यांनी दहा वर्ष व प्रत्येकी दोन हजाराची बुधवारी (ता. 26) शिक्षा ठोठावली.

नांदेड : वाद सोडविण्यासाठी गेलेल्या युवकाचा खून करणाऱ्या तिघांना येथील जिल्हा न्यायाधीश (पहिले) एस. एस. खरात यांनी दहा वर्ष व प्रत्येकी दोन हजाराची बुधवारी (ता. 26) शिक्षा ठोठावली.

शहराच्या जयभीमनगर भागात 9 मे 2017 रोजी गल्लीतील मारोती जोंधळे याच्यासोबत वाद घालून त्याला काही तरूण मारहाण करीत होते. हा वाद मिटविण्यासाठी बुध्दभूषण मारेती कांबळे (वय 19) व त्याचा मावस भाऊ अजय गोपीचंद चिते हे दोघे तिथे गेले. यावेळी आमच्या भांडणात तु कशाला पडत आहेस असे म्हणून अतिष उर्फ अक्षय गौत्तम वाघमारे (वय 19) याने खंजरने अजय चितेवर वार केला. परंतु तो वार त्याने चुकविला. मात्र अनिकेत उर्फ चिकु संदीप कांबळे (वय 19) याने अजय चितेला दाबुन धरले व निहाल उर्फ शेट्टी विनायक पाईकराव (वय 21) याने खंजरने मारून अजय चितेचा खून केला. जखमी अवस्थेत त्याला शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय सुत्राने सांगितले. या प्रकरणी बुध्दभूषण कांबळे याच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात वरील तिघांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपास फौजदार दिनेश काशिद यांनी करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. न्यायालयाने यात ११ साक्षिदार तपासले. वैद्यकीय अहवाल, पोलिसांचा पंचनामा आणि साक्षिदारांचे बयान महत्वाचे ठरले. सरकारी वकिल यदुपथ देशमुख अर्धापूरकर आणि आरोपींचे वकिल आर. जी. परळकर या दोघांचा युक्तीवाद ऐकून न्यायाधिश खरात यांनी अतीश वाघमारे, अनिकेत कांबळे आणि निहाल पाईकराव या तिघांना दहा वर्ष व प्रत्येकी दोन हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3 gets punished for murder at Nanded