नांदेडमध्ये वेगवेगळ्या घटनांत तिघांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

नांदेड : जिल्ह्यात वेगवेगळ्या तीन घटनांत तीन जणांनी आत्महत्या केली. यात महिलेनी उंदीर मारण्याचे औषध, दुसऱ्याने किटकनाशक तर तिसऱ्याने गळफास घेऊन जीवन संपविले. याप्रकरणी अर्धापूर, माहूर आणि देगलूर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

नांदेड : जिल्ह्यात वेगवेगळ्या तीन घटनांत तीन जणांनी आत्महत्या केली. यात महिलेनी उंदीर मारण्याचे औषध, दुसऱ्याने किटकनाशक तर तिसऱ्याने गळफास घेऊन जीवन संपविले. याप्रकरणी अर्धापूर, माहूर आणि देगलूर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

अर्धापूर तालुक्यातील देगाव (कु) येथे राहणारी महिला प्राची संतोष कदम (वय 21) हिने आपल्या घरी रविवारी (ता. 29) सकाळी साडेआठच्या सुमारास उंदीर मारण्याचे औषध खाल्ले. काही वेळाने तिला त्रास सुरू झाल्याने नातेवाईकांनी लगेच नांदेडच्या शासकिय रूग्णालयात दाखल केले. परंतु उपचार सुरू असतांना तिचा मृत्यू झाला. दत्ता कदम यांच्या माहितीवरून अर्धापूर ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक जामोदकर हे करीत आहेत. 

दुसऱ्या घटनेत माहूर तालुक्यातील मालवाडा येथील सुभाष भोपा जाधव (वय 40) यांनी कुठल्या तरी रागाच्या भरात रविवारी (ता. 29) सायंकाळी सहाच्या सुमारास किटकनाशक प्राशन केले. त्यांनाही त्रास सुरू झाल्याने माहूर येथील ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. डॉ. किरण वाघमारे यांच्या माहितीवरुन माहूर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार जाधव हे करीत आहेत. 

तर तिसऱ्या घटनेत देगलुर शहरातील शारदानगर भागात शंकर नागेभाई गोयल (वय 55) यांनी भाड्याच्या घरात रविवारी (ता. 29) सकाळी सात वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. ते मुळचे अहमदाबाद येथील रहिवासी असून ते देगलुर येथे कपडे कटींग व सिलाईचे काम करीत होते. या प्रकरणी महेश डोईजोडे यांच्या माहितीवरुन देगलुर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास पोलिस हवालदार शेख ताहेर हे करीत आहेत.

Web Title: 3 suicide in different situation in nanded