लोअर दुधना’त १३ टक्के पाणीसाठा ...

dharan
dharan


सेलू : आॅक्टोंबर महिन्यात परतीचा पाऊस लोअर दूधना प्रकल्प धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार झाल्याने  दुधना धरणात वेगाने पाणीसाठा झाल्याने सेलू शहरासह धरणावर अवलंबुन असणाऱ्या पाणीपुरवठा योजनेला येणाऱ्या उन्हाळ्यात  पाणी टंचाईचे ‘नो’ टेन्शन राहणार आहे.  सद्य:स्थितीत १३४ दलघमी इतका एकूण जलसाठा निर्माण झाला आहे. जो की जिवंत पाणीसाठा १२.९० टक्के इतका आहे. त्यामुळे आता सेलूकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.

दोन वर्षांपासून लोअर दुधना प्रकल्प धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने धरणात वेगाने पाणी साठा झाला नाही. त्यातच अनेक वेळा परभणी व पूर्णा या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्यासाठी आणि उन्हाळ्यात जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी दुधना प्रकल्पातून दूधना नदी पात्रात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे जून महिन्यात प्रकल्प मृत साठ्यात गेला होता. त्यानंतर ही पाऊस पडत नसल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत अपेक्षित वाढ होऊ शकली. त्यामुळे सेलू शहराला पाणी टंचाई निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला होता. जून महिन्यानंतर शहराला पाणीपुरवठा करताना सेलू नगर पलिकेला मोठी कसरत करावी लागत होती. त्यानंतर पालिका प्रशासनाकडून बॅक वाॅटर मधून  चर खोदून इंटक वेलपर्यंत पाणी आणले जात होते.


दुधनातील पाणी पातळी लक्षात घेता उन्हाळ्यात शहराला भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची भिती वाटत असतानाच ता.१९ आॅक्टोबरपासून जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे लोअर दुधना प्रकल्प मृत साठ्यातून बाहेर आला. त्यामुळे येणाऱ्या संपूर्ण उन्हाळाभर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्यासाठी लोअर दुधना प्रकल्पात चांगला पाणी साठा निर्माण झाला आहे. त्यासाठी सेलू नगर पालिका प्रशासनाने आगामी जून महिन्यापर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे.

सेलूकरांना दिलासा
परतीच्या प्रवासाने लोअर दुधना प्रकल्प धरणात सद्य:स्थितीत १३४ दलघमी इतका एकूण जलसाठा निर्माण झाला आहे. जो की जिवंत पाणीसाठा १२.९० टक्के इतका आहे. सेलू शहराला पाणी पुरवठा करणाऱ्यासाठी पंप हाऊस आहे. त्या भोवती इंटक वेल आहेत. प्रकल्प मृत साठ्यात गेल्या नंतर सर्व १४ इंटक वेल कोरड्या पडल्या होत्या. मात्र, परतीच्या पावसाने  लोअर दुधना प्रकल्पात वेगाने पाणीसाठा उपलब्ध  झाल्याने पाणी टंचाईपासून शहराला दिलासा मिळाला आहे. तसेच गतवर्षी उन्हाळ्यात परभणीसह पूर्णा, नांदेड शहराला या प्रकल्पातून दोन वेळेस पाणीपुरवठा केला होता. गरज भासल्यास यंदाही पाणीपुरवठा होऊ शकतो, इतका पाणीसाठी उपलब्ध आहे.
.....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com