रुबेला लसीकरणानंतर काही मिनिटांतच दगावले बाळ

Injections
Injections

जालना : हसनाबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात गोवर रुबेलाची लस दिल्यानंतर काही मिनिटांतच तीन वर्षाच्या बाळाचा मृत्यू झाला. गोवर रुबेलाची लस दिल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच तीन वर्षीय बाळाचा दुर्दैवी अंत झाला, असा दावा नातेवाईकांनी केला आहे.

सचिन सोनवणे असे मृत्युमुखी पडलेल्या तीन वर्षाच्या मुलाचे नाव आहे. भोकरदन तालुक्यातील हसनाबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली असून या घटनेमुळे खळबळ उडालीये.

भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सचिन सोनवणे या तीन वर्षाच्या बाळाला गोवर रुबेलाची लस देण्यासाठी नेण्यात आले होते. दवाखान्यात असलेल्या डॉक्टरांनी लसीकरण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतंच सचिनचा मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या नातेवाईकांनी केलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com