मुंबई-नागपुर महामार्गावर ट्रक-बसच्या धडकेत 30 वऱ्हाडी जखमी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

परभणी येथून नाशिकला वऱ्हाडी घेऊन जाणारी बस व मालवाहु ट्रकची समोरासमोर धडक झाली.

पालखेड - मुंबई-नागपुर महामार्गावर शुक्रवार (ता. 11) तिडी मकरमतपुर (ता. वैजापुर) येथे ट्रक व बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात 30 वऱ्हाडी जखमी झाले. त्यातील 13 जण गंभीर जखमी झाले आहे. 

Palkhed Accident

परभणी येथून नाशिकला वऱ्हाडी घेऊन जाणारी बस व मालवाहु ट्रकची समोरासमोर धडक झाली. अपघात जखींना वैजापुर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये दोन्ही गाड्यांचा समोरील भागाचे मोठे नुकसान झाले. यात बसचा चालक विकास तांबे हे गंभीर जखमी झालेले आहे. गंभीर जखमी झालेल्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच वैजापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रामहरी जाधव, पोलिस कॉन्स्टेबल गुणवंत थोरात, पोलिस पाटील भाऊसाहेब डुकरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला.

Palkhed Accident

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 30 people injured in accident at mumbai nagpur highway