मराठवाड्यात 316 टॅंकरने पाणी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

औरंगाबाद - मराठवाड्यात उष्णतेचा पारा जसजसा वाढतोय तसतशी टंचाईची झळही अधिक तीव्र होत चालली आहे. जवळपास 24 तालुक्‍यांत पाणीटंचाईने डोके वर काढले असून, औरंगाबाद जिल्ह्यात टंचाईची झळ अधिक तीव्र आहे. गत आठवड्याच्या तुलनेत जालना, नांदेड, परभणी व हिंगोली आदी जिल्ह्यातही टंचाईग्रस्त गाव-वाड्यांच्या संख्येत वाढ झाली असून, पाच जिल्ह्यांतील पाणीपुरवठ्यासाठीच्या टॅंकरची संख्या 316 वर पोचली आहे. टंचाई निवारण्यासाठी पाचही जिल्ह्यांतील 595 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 

सद्यःस्थितीत टंचाईची सर्वाधिक झळ औरंगाबाद जिल्ह्याला बसते आहे. जिल्ह्यातील 190 गावे व 13 वाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भीषण टंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील पाणीसाठ्यांची बिकट बनलेली अवस्थाही टंचाईत वाढ करण्यास कारणीभूत ठरते आहे. मार्चच्या अखेरच्या आठवड्यात औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड या पाचही जिल्ह्यांतील 236 गाव व 17 वाड्यांना टंचाईचा सामना करावा लागत होता. त्यामध्ये एप्रिलच्या सुरवातीलाच 27 गाव वाड्यांची भर पडली आहे. 

टंचाईग्रस्त...  - 24  तालुके 
263  - गावे 
595  - विहिरींचे अधिग्रहण 

Web Title: 316 water tankers in Marathwada