मराठवाड्यात सरासरीच्या ३३ टक्केच पाऊस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जुलै 2016

औरंगाबाद - दुष्काळग्रस्त मराठवाड्यात दीड महिन्याच्या कालावधीत वार्षिक सरासरीच्या केवळ ३३.५ टक्के पाऊस पडला आहे. हिंगोली आणि नांदेड या दोनच जिल्ह्यांत वार्षिक सरासरी ४० टक्के पाऊस झाला, तर उस्मानाबाद, लातूर आणि बीड या सर्वाधिक दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये सर्वांत कमी पाऊस पडला आहे.

जूनमध्ये मॉन्सूनचे आगमन लांबले. पावसालाही उशिराने सुरवात झाली. जुलैतील पहिल्या आठवड्यात मात्र दमदार पाऊस झाला. अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला. मात्र, तालुका, जिल्ह्याचा विचार केल्यास अतिवृष्टीचा फायदा केवळ गावापुरताच झाल्याचे दिसून येत आहे. अनेक तालुक्‍यांमध्ये आजही लहान-मोठ्या धरणांत पाणी साचल्याचे चित्र नाही. 

१८ जुलैपर्यंत नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, भोकर, हदगाव, हिमायतनगर, नांदेड या तालुक्‍यांत वार्षिक सरासरीच्या ५० टक्के तर मुखेडमध्ये ४० टक्‍क्‍यांपर्यंत पाऊस झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, सिल्लोड, औरंगाबाद या तालुक्‍यांत वार्षिक सरासरीच्या ४० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाऊस पडला आहे.

 जालन्यातील परतूर, मंठा, अंबड आणि जालना, परभणी जिल्ह्यातील पूर्णा, सेलू, हिंगोलीतील कळमनुरी, वसमत तालुक्‍यांत पावसाने वार्षिक सरासरीच्या ४० टक्‍क्‍यांपर्यंतचा आकडा गाठला आहे. बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत एकाही तालुक्‍यात वार्षिक सरासरीच्या ४० टक्‍क्‍यांपर्यंत पाऊस झालेला नाही.

Web Title: 33 per cent of the average rainfall in Marathwada

टॅग्स