34 लाखांची बनावट बिटी बियाणे जप्त ; विशेष पोलिस पथकाचा छापा

प्रल्हाद कांबळे
शनिवार, 14 एप्रिल 2018

किनवट तालुक्यातील सारखणी व वाडोळा या ठिकाणी असलेल्या वेअर हाऊसवर छापा टाकून 34 लाखांचे बोगस बिटी बियाणे जप्त करण्यात आले. ही कारवाई विशेष पोलिस पथकाने केली. 

नांदेड : किनवट तालुक्यातील सारखणी व वाडोळा या ठिकाणी असलेल्या वेअर हाऊसवर छापा टाकून 34 लाखांचे बोगस बिटी बियाणे जप्त करण्यात आले. ही कारवाई विशेष पोलिस पथकाने केली. 

कृषी अधिकाऱ्यांच्या समोर पंचनामासत्र सुरू असून, ही कारवाई शनिवारी (ता. १४) दुपारी दोन वाजता पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकांनी केली. यामुळे बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांच्या पथकांने ही धाडसी कारवाई केली. या कारवाईत तब्बल 34 लाखांचे बनावट बिटी बियाणे जप्त करण्यात आली.

Web Title: 34 lakh Bogus pesticides seized Special Police Department Action

टॅग्स