एकात्मीक आदिवासी प्रकल्प कार्यालयात 34 लाखाचा अपहार 

प्रल्हाद कांबळे 
शनिवार, 21 जुलै 2018

नांदेड : किनवट येथील एकात्मीक आदिवासी प्रकल्पांतर्गत आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध शासकिय योजना शासनस्तरावरून राबविण्यात येतात. परंतु या योजनांच फस्त करणाऱ्या तत्कालीन प्रकल्प अधिकाऱ्यांसह पाच जणांवर अपहार व फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड : किनवट येथील एकात्मीक आदिवासी प्रकल्पांतर्गत आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध शासकिय योजना शासनस्तरावरून राबविण्यात येतात. परंतु या योजनांच फस्त करणाऱ्या तत्कालीन प्रकल्प अधिकाऱ्यांसह पाच जणांवर अपहार व फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील डोंग-दरी, वाडी तांडे व कड्या-कपारीमध्ये वास्तव्यास असलेल्या आदिवासी समाजाचा जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांना चांगल्या दर्जाचे जीवन जगण्यासाठी विविध योजना शासनस्तरावरून राबविण्यात येतात. त्यात एच.डी.पी. पाईप पुरवठा येाजना, सकल पुरवठा योजना, कन्यादान योजना, शेळी गट वाटप योजना, विद्यूतीकरण योजना यासह आदी योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात येतात. परंतु येथील उदासिन अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे या योजना खऱ्या लाभार्थ्यापर्यंत पोहचल्या नाहीत.

मात्र 2004 ते 2009 या काळात तत्कालीन प्रकल्प अधिकारी शामराव वाकतकर यांनी आपल्या काही अधिनस्त अधिकाऱ्यांना हाताशी धरुन वरील योजनेसाठी आलेले 33 लाख 75 हजार 720 रुपये आपल्या फायद्यासाठी परस्पर उचलून घेतले. व ते लाभार्थ्यांना वाटप केल्याचे शासकिय दप्तरी दाखविले. परंतु या प्रकरणात न्यायालयीन समिती स्थापन करण्यात आली. 

न्यायाधिश गायकवाड यांच्या आदेशावरून अपहार व फसवणूक झाल्याप्रकरणी प्रकल्प अधिकारी शामराव वाकतकर, निरीक्षक डी. जे. नरवाडे, एम. बी. देशमुख, एस. पी. उदवार, संबंधीत कंपनीचे साहित्य पुरवठा करणारे कंत्राटदार आणि कार्यालयातील काही इतर कर्मचारी यांच्याविरूध्द गुन्हा दाखलचे आदेश दिले. यावरून प्रकल्प अधिकारी छंदक लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन किनवट ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल कांबळे हे करीत आहेत.

Web Title: 34 lakhs of unprotected tribal project