जिल्हा बॅँकेसाठी गुरुवारी ३५ अर्ज दाखल 

download
download

परभणी ः परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक संचालक मंडळाच्या निवडणूकीसाठी गुरुवारी (ता.१८) अनेक दिग्गज, मातब्बर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तब्बल ३५ अर्ज दाखल झाले. बॅंकेचे माजी अध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर, माजी आमदार सुरेश देशमुख, आमदार मेघना बोर्डीकर, उपमहापौर भगवान वाघमारे, संचालक सौराजसिंह परिहार यांच्यासह रुपाली पाटील गोरेगावकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. 

निवडणूकीची रंगत वाढतेय
जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणूकीची रंगत वाढत आहेत. बॅंकेवर वर्चस्व राखलेल्या अजुन एका नेत्यानेही आपले पत्ते उघडले नाहीत. कोण कोणत्या पॅनॉलमध्ये लढणार, कोण कोणाला आपल्या पॅनॉलमध्ये घेणार याचा थांगपत्ता लागेनासा झाला आहे. परंतू, सोमवार (ता.२२) पर्यंत चित्र स्पष्ट होईल. 

विविध कार्यकारी सेवा सहकारी संघ
विविध कार्यकारी सेवा सहकारी व धान्य अधिकोष मतदार संघातून आमदार सुरेश वरपुडकर, आमदार मेघना साकोरे बोर्डीकर, माजी आमदार साहेबराव पाटील गोरेगावकर यांच्या स्नुषा श्रीमती रुपाली राजेश पाटील गोरेगावकर यांच्यासह सुरेशराव पतंगे वडगावकर, श्रीकांत उत्तमराव भोसले, यशश्री भगवान सानप, भगवान ज्ञानोबाराव सानप, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश उत्तमराव विटेकर, दत्तराव शावजी काळे, सविता सुनिल नादरे, खोब्राजी गणेशराव नरवाडे, त्रिंबकराव बालासाहेब मुळे, नारायण सदाशिवराव शिंदे, गंगाधरराव नामदेवराव कदम यांनी अर्ज दाखल केले.

कृषी पणन संस्था संघ
कृषी पणन संस्था व शेतीमाल प्रक्रिया संस्था मतदार संघातून बॅंकेचे माजी अध्यक्ष आमजी आमदार सुरेश देशमुख, सुशिलकुमार सुरेश देशमुख, बालासाहेब हरिभाऊ निरस, भावना रामप्रसाद कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. इतर शेती संस्था मतदार संघातून विद्यमान संचालक विजय रावसाहेब जामकर, उपमहापौर भगवान नारायणराव वाघमारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. 

महिला प्रतिनिधी संघ
महिला प्रतिनिधी मतदार संघासाठी डॉ.विद्या कालीदास चौधरी, संजीवणी भगवानराव वटाणे, यशश्री भगवान सानप, रुपाली राजेश पाटील यांनी अर्ज दाखल केला. अनुसूचित जाती/अनुसुचित जमाती मतदार संघासाठी शिवाजी बाबुराव मव्हाळे यांनी तर विमुक्त जाती/भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातून भगवान मारोतराव वटाणे, रेणूकाबाई पांडूरंग राठोड, भगवान ज्ञानोबाराव सानप, सुमित स्वराजसिंह परिहार व माजी संचालक सौराजसिंह शिवपालसिंग परिहार, सुरेश राजाभाऊ गिरी यांनी आपले उमेदवारी अर्ज जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्याकडे दाखल केले. 

संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com