42 लग्नमुहूर्तांमुळे मिळाले 35 हजार भुकेलेल्यांना अन्न

मधुकर कांबळे  
सोमवार, 21 मे 2018

औरंगाबाद : लग्नसोहळ्यातील जेवणावळीत भरपेट जेवण करुन ढेकर देत
प्लेटमध्ये मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिलेले अन्न फेकले जाते.

अन्नासाठी आर्त हाक मारणारे भुकेले चेहरे पाहताना अस्वस्थ होणाऱ्या
संवेदनशील मनांची माणसे एकत्र येऊन त्यांनी अन्न वाचवा समिती स्थापन
केली. या समितीने राबवलेल्या मिशन फॉर हंगरफ्री सिटीअंतर्गत यावर्षीच्या
लग्नसराईतील 42 मुहूर्तांमधून सुमारे 35 हजार लोकांना पुरेल इतके अन्न
जमा करुन अन्नदान केले आणि या लोकांची भुक भागवण्याचे सत्कर्म केले.

यावर्षी जुलै अखेरपर्यंत 54 लग्नमुहूर्त असून आणखी 12 मुहूर्त शिल्लक
आहेत. यातुन आणखी अन्न मिळण्याची अशा समितीला आहे.

Web Title: 35 thousand hungry people get food due to 42 marriages