रस्त्यावर फेकला ३६ क्विंटल कांदा (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 जानेवारी 2019

वैजापूर - कांद्याला प्रति क्विंटल केवळ ५२  रुपये भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्याने बुधवारी (ता. दोन) शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात संपूर्ण कांदा रस्त्यावर टाकून सरकारचा निषेध केला. ट्रॅक्‍टरभर कांदा रस्त्यावर टाकल्यामुळे तासभर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

येथील मुंबई-नागपूर महामार्गावरील बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये चाडगाव येथील शेतकरी प्रमोद गायकवाड यांनी ट्रॅक्‍टरद्वारे ३६ क्विंटल कांदा विक्रीसाठी आणला होता. चिंचडगाव येथील तांबे यांनीही कांदा विक्रीसाठी आणला होता; मात्र लिलावाद्वारे कांद्याला केवळ ५२ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाल्याने हे शेतकरी संतप्त झाले. 

चाडगाव, चिंचडगाव येथून कांदा बाजारापर्यंत आणण्यास सुमारे दोन हजारांचा खर्च लागला. ३६ क्विंटल कांद्याचे १८०० रुपये मिळत असल्याने शेतकऱ्यांनी कांदा चौकात आणून टाकला. नगरपालिका प्रशासनाने हा कांदा भरून घेतला.

वैजापूर अतितीव्र दुष्काळग्रस्त तालुक्‍यांच्या यादीत आहे. शेतकऱ्यांनी टॅंकरने पाणी आणून कांदा उत्पादन घेतले; मात्र योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
- प्रमोद गायकवाड, शेतकरी

Web Title: 36 quintals of onion on the road by farmer