सिंचनासाठी ३८ कोटींचा निधी मंजूर

राजेश दारव्हेकर
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

 हिंगोली जिल्‍ह्याच्या सिंचन अनुषेश भरून काढण्यासंदर्भात तत्‍कालीन वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देऊन शंभर कोटी रुपयांची मागणी केली असल्याचे श्री. मुटकुळे यांनी सांगितले. त्यामुळे बंधारे व साठवण तलावासाठी निधी मंजूर झाल्याचा दावाही त्यांनी केला.

हिंगोली : जिल्‍ह्यात सिंचनासाठी ३८ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून यात कोल्‍हापुरी बंधारे, साठवण बंधाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे त्‍याचा लाभ सिंचनासाठी होणार असल्याची माहिती आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी गुरुवारी (ता. १३) पत्रकार परिषदेत दिली.

येथील भाजपच्या कार्यालयात ही पत्रकार परिषद घेण्यात आली. जून २०१९ मध्ये आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी तत्‍कालीन वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जिल्‍ह्याच्या सिंचन अनुषेश भरून काढण्यासंदर्भात निवेदन देऊन शंभर कोटी रुपयांची मागणी केली असल्याचे श्री. मुटकुळे यांनी सांगितले. 

३८ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी मंजूर

त्‍यातून जिल्‍ह्यात ३८ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे त्‍यांनी सांगितले. यात कोल्‍हापुरी बंधाऱ्यांसाठी सेनगाव येथे १३२.८२ लक्ष रुपये, वरुड चक्रपान १२६.०८ लाख, पुसेगाव २०.७८ लाख, सुलदली बुद्रुक २१.२२ लाख, सुलदली बुद्रुक २१.२२ लाख, हिवरा २३.४२ लाख, मन्नास पिंपरी २२.२३ लाख, मन्नास पिंपरी २३.८९ लाख, कोंडवाडा ३६.९५ लाख, कौठा ४९.३३ लाख, गुगूळपिंपरी ३१.२४ लाख या गावांचा समावेश आहे.

हेही वाचाफिरत्या चहा दुकानाने साधली ‘प्रगती’

साठवण बंधाऱ्यांचा समावेश

हिंगोली तालुक्‍यातील साठवण बंधाऱ्यांत काळकोंडी २३.५५ लाख, ईडोळी ४२.१९ लाख, नवखा ४६.९४ लाख, नवखा दुसरा साठवण बंधारा ४६.८६ लाख, डिग्रस कन्हाळे ४१.०८ लाख, डिग्रस कन्हाळे दुसरा साठवण बंधारा ४२.४९ लाख, सावरखेडा ६७.४७ लाख यांचा समावेश आहे.

आसोला येथे तीन बंधाऱ्याचा समावेश

औंढा तालुक्‍यातील येहळेगांव येथील साठवण बंधाऱ्यासाठी ३९.८१ लाख, तसेच येहळेगाव येथे दुसरा बंधारा ४५.२६ लाख, हिवरा जाटू ५२.०७ लाख, हिवरा जाटू दुसरा साठवण बंधारा ५२.५० लाख, येडूद ७२.०५ लाख, वसई ७४.८८ लाख, राजापूर जांब १४.०१ लाख, नागझरी ३१.०९ लाख, गांगलवाडी ५४.३९ लाख, भोसी ४१.१२ लाख, लोहरा १४.७४ लाख, जलालदाभा १५.३२ लाख, उमरा १३.६८ लाख, वाळकी १३.१३ लाख रुपये, भोसी ३८.०३ लाख, जांभळी तांडा ३९.५३ लाख, आसोला १४.७२ लाख, आसोला दुसरा बंधारा १३.९५ लाख तसेच तिसऱ्या बंधाऱ्यासाठी १३.५२ लाख रुपयांच्या निधीचा समावेश आहे.

यावर क्लिक करारेऊलगावात उभारली बौद्ध गया विहाराची प्रतिकृती

औंढा तालुक्यात बारा बंधाऱ्यांचा समावेश

तसेच औंढा तालुक्‍यातील नंदगाव साठवण बधाऱ्यासाठी ५७.०१ लाख, दुसऱ्या बंधाऱ्यासाठी ४५.१८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मेथा ४३.४८ लाख, दुसऱ्या बंधाऱ्यासाठी ६०.७० लाख, पांगरा ५०.३४ लाख, गढाळा ४.४९ लाख, महाळजगांव ४०.६२ लाख, उंडेगाव २९.७९ लाख, जडगाव ४०.९६ लाख, लांडाळा ५७.३३ लाख, चिंचोली ३५.९१ लाख, दौडगाव ५३.२१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

शेवाळा येथे कोल्हापुरी बंधारा

कळमनुरी तालुक्‍यातील शेवाळा कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी ४९९.१३ लाख, शिवणी साठवण बंधाऱ्यासाठी २१.२९ लाख, दुसऱ्या बंधाऱ्यासाठी २२.६६ लाख, वडगाव १९.७१ लाख, वडगाव दुसरा बंधारा १९.२५ लाख, साळवा साठवण बंधारा १९.८८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. तसेच वसमत तालुक्‍यातील गिरगाव साठवण बंधाऱ्यासाठी ३४.९२ लाख, गिरगाव दुसरा बंधारा ४०.०२ लाख, मारलापूर १४.८१ लाख, लिंगी २८.८६ लाख, लिंगी दुसऱ्या बंधाऱ्यासाठी १४.०९ लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 38 crore funding for irrigation is approved