परभणीच्या 39 मंडळात 47 मिलीमिटर पाऊस

गणेश पांडे
शनिवार, 9 जून 2018

परभणी : परभणी जिल्ह्यातील 39 महसुल मंडळात शनिवारी (ता.9) सकाळ पर्यंत 47 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस पूर्णा तालुक्यात झाला आहे. या ठिकाणी सरासरी 81 मिलीमिटर पाऊस झाला आहे.

परभणी : परभणी जिल्ह्यातील 39 महसुल मंडळात शनिवारी (ता.9) सकाळ पर्यंत 47 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस पूर्णा तालुक्यात झाला आहे. या ठिकाणी सरासरी 81 मिलीमिटर पाऊस झाला आहे.

परभणी तालुक्यातील आठ महसुल मंडळात 30.25, पालमच्या तीन महसुल मंडळात 24 मिलीमिटर, पूर्णेच्या पाच महसुल मंडळात 81 मिलीमिटर, गंगाखेडच्या चार महसुल मंडळात 48.75 मिलीमिटर, सोनपेठच्या दोन महसुल मंडळात 43 मिलीमिटर, सेलूच्या पाच महसुल मंडळात नऊ मिलीमिटर, पाथरीच्या तीन महसुल मंडळात 20 मिलीमिटर, जिंतूरच्या सहा महसुल मंडळात 16.58 मिलीमिटर आणि मानवतच्या तीन महसुल मंडळात 33.73 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. पूर्णा तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला असून या ठिकाणी शुक्रवारी काही गावाचा संपर्क तुटला होता. तो आज सकाळी 
सुरुळीत झाला आहे. सोनपेठ तालुक्यात शनिवारी सकाळपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली होती. पहाटे तीन वाजल्यापासूनच शहरासह तालुक्यात मुसळधार पाऊस झाला.
 
Web Title: in 39 mandal of parbhani 47 mm rain