परळी वैजनाथ : रिक्षा- ट्रॅव्हल्स धडकेत 4 तरुण ठार

प्रवीण फुटके
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

परळी वैजनाथ (जि. बीड) : अॅपे रिक्षाला भरधाव ट्रॅव्हल्सने जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात चार युवक ठार तर एक गंभीर झाल्याची घटना गुरुवारी (ता. 5) रात्री 12.30 वाजता बीड - परळी राज्यरस्त्यावरील पांगरी जवळ घडली.

अपघातात ठार झालेले सर्व तरुण तालुक्यातील पांगरी येथील रहिवासी आहेत. पांगरी येथील तरुण गुरुवारी रात्री पांगरीहून परळीकडे येत होते. यावेळी नांदेडहुन पुण्याकडे निघालेल्या समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्स (क्रमांक एमएच 09 बीए 4334) व रिक्षाची समोर समोर जोराची धडक झाली. धडकेत रिक्षाचा समोरचा भाग चक्काचुर झाला.

यामध्ये बन्सी(बाळु) रामभाऊ पाचांगे (वय २४), श्रावण नागोराव पाचांगे (वय २०),
सुशिल उत्तम पाचांगे(वय२०),  प्रकाश विलास पंडित(वय २१) या चौघांचा मृत्यू झाला. तर गंगाधर अशोक पाचांगे हा गंभीर जखमी असून त्याच्यावर  लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, एकाच गावातील चार तरुण ठार झाल्याने गावावर शोककळा पसरली असून कुटुंब आणि नातेवाईक शोकसागरात बुडाले आहेत. 

Web Title: 4 died in an accident near parali