बीड - मच्छिंद्रगडावरील यंदाचा ४२ वा नारळी सप्ताह रद्द 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 March 2020

बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गडावरील मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आसून एकादशीनिमित्त भरणारी वारी रद्द करण्यात आल्याचे गडाचे महंत विठ्ठल महाराज यांनी सांगितले. जालिंदर संस्थान रायमोह येथे होणारा अखंड हरिनाम सप्ताहही रद्द करण्यात आला आहे.  

शिरूर कासार (जि. बीड) -  तालुक्यातील मच्छिंद्रगडावरील या वर्षीचा ४२ वा नारळी सप्ताह कोरोनाच्या खबरदारीमुळे रद्द करण्यात आला आहे.

मच्छिंद्रगडावर निगमानंद महाराज यांनी प्रारंभ केलेला अखंड हरिनाम सप्ताह यंदा नारायणवाडी येथे २९ मार्चला होणार होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मठाधिपती जनार्दन महाराज मच्छिंद्रगड यांनी ग्रामस्थांची बैठक घेऊन प्रशासनाला सहकार्य करून सप्ताह रद्द करण्याचा निर्णय घेतला. गहिनीनाथ गडावरील मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आसून एकादशीनिमित्त भरणारी वारी रद्द करण्यात आल्याचे गडाचे महंत विठ्ठल महाराज यांनी सांगितले. जालिंदर संस्थान रायमोह येथे होणारा अखंड हरिनाम सप्ताहही रद्द करण्यात आला आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 42nd religious program canceled at Machindragad