औरंगाबाद-जळगाव मार्गावर एसटी बस-ट्रकची धडक; 43 जखमी

नवनाथ इधाटे
गुरुवार, 10 मे 2018

रुग्णवाहिका खचाखच भरुन घटीला दाखल
फुलंब्री येथील महात्मा फुले रुग्णवाहिका चालक विजय देवमाळी यास सदर अपघातची माहिती मिळताच त्यांनी आपल्या तिन्ही रुग्णवाहिका घटनास्थळी हजर करुन जखमीना त्वरीत  घाटी दवाखाण्यात उपचारासाठी दाखल केले. या अपघात ग्रस्तांना चौका येथील सरपंच संतोष वाघ, ग्रामपंचायत सदस्य दत्तू साळवे, शंकर बोंगाणे, अजिनाथ पवार यांनी मदत कार्य केले. तसेच अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना उपचारासाठी मदत करुन वाहतुक सुरळीत केली.

फुलंब्री : फुलंब्री औरंगाबाद  महामार्गावर असलेल्या  निजीवुड कंपनी समोर राज्य परिवहन महामंडाळाच्या बसला एका आयशर ट्रकने जोरदार धडक दिल्याने एसटी बस मधील एकुण 43 प्रवाशी जखमी झाले. त्यापैकी तिन जणाची प्रक्रुती गंभीर आहे. सर्व जखमीवर औरंगाबाद येथील शासकीय घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहे. सदरील घटना बुधवारी (ता.नऊ) रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. 

या बाबत अधिक माहिती अशी की, राज्य परिवहन महामंडळाची रावेर आगाराची बारामती - रावेर बस क्रमांक एम.एच-20 बी.एल.3100 ही बस फुलंब्रीकडे येत असतांना निजीवुड सीड्स कंपनी समोर  औरंगाबादकडे जाणारा आयशर मालट्रक क्रमांक एम.एच -18  ए.ए. 5454 ने सदर बसला समोरासमोर जोराची धडक दिली. भरधाव वेगात असलेल्या आयशर बस धडकेत आयशर चालकासह बस मधील एकुण 43 जण जखमी झाले. या जोरदार धडकेत दोन्ही वाहनाच्या  समोरील भागाचा चुराडा झालेला आहे. हा अपघात घडताच घटनास्थळावर एकच हांहाकार उडाला जोरदार किचकाळ्या, आरडा ओरड सुरु झाली. कोणाच्या डोक्याला तर कोणाच्या हातापायाला गंभीर अशा जखमा झालेल्या आहेत.

या अपघातात जखमी झालेल्याची नावे अशी, अलका रमेश कुलकर्णी (वय 50 रा.सिल्लोड), ज्योती योगेश सोनवणे (वय 25 रा.पांगरी ता.सिल्लोड), देविदास भीमराव कुलकर्णी (वय 50 रा. वरुड पिंप्री ता.सिल्लोड), रामजी शेनफडू मोरे (वय 62 रा.घाटनाद्रा ता.सिल्लोड), सुभाष राजाराम चौबे (वय 54 रा.सारोळा ता.सिल्लोड), नथ्थु पांडुरंग गाडे (वय 35 रा.सुभानपूर ता.भोकरदन), सरुबाई रामदास सपकाळ (वय 50 रा. इसोडा ता.भोकरदन), मुक्ता नथ्थु गाडे (वय 25 रा.सुभानपूर ता.भोकरदन), युवराज नथ्थु गाडे (वय 4 वर्ष रा.सुभानपूर ता.भोकरदन), रामदास कमलुबा सपकाळ (वय 53 रा.इसोडा ता.भोकरदन), नागसेन पंडित घोरपडे (वय 20 रा.आडगाव ता.भोकरदन), जगन्नाथ पहाळू चौधरी (वय 65 रा.रामानंदनगर जळगाव), साहेबराव भिका मनगटे (वय 65 रा.लोहगाव ता.सिल्लोड), परिगाबाई साहेबराव मनगटे (वय 60 रा. लोहगाव ता.सिल्लोड), अबेदाबी मदार सय्यद (वय 55 रा.केरहाला ता.सोल्लोड), वेणूबाई कृष्णा साळवे (वय 60 रा.वडगाव ता.औरंगाबाद), निर्मला सूर्यकांत महाजन (वय 65 रा.शांतीनगर ता.भुसावळ), केशव अविनाश महाजन (वय 7 रा. शांतीनगर ता.भुसावळ), शशिकलाबाई नथ्थु गायकवाड (वय 60 वर्ष रा.भोकरदन जि. जालना), सुशीला मंगल महाजन (वय 60 रा.एरंडोल), सुंदराबाई परशुराम कुमावत (रा.पळशी ता.सिल्लोड), खुशी धनंजय मळी (वय 8 रा.एरंडोल), तुषार साहेबराव सोनवणे (वय 45 मुक्ताईनगर), सुभाष विठ्ठलराव पाटील (वय 52 रा.सिल्लोड), लता विष्णू तळेकर (वय 35 रा.वडशर ता.भोकरदन), बाळासाहेब पांडुरंग पलोदकर (45 भाबळगाव ता.कर्जत), शकीलाबी नवाब खा (वय 55 रा.नानेगाव ता.सिल्लोड0, योगेश मंगल महाजन (वय 29 रा.एरंडोल जळगाव), दीपक प्रकाश सोनवणे (वय 32 रा.पिंपळखोरा ता.एरंडोल जळगाव), लालजी पटेल (वय 64 रा.सिल्लोड), प्रवीण रवींद्र सपकाळ (रा.भुसावळ, पंकज कुमार), विठ्ठल भोमे (वय 65 रा.आडगाव ता.सिल्लोड), अदनान जमिल सय्यद (वय 7 रा.केरहाला ता.सिल्लोड), मोबिन अहमद पटेल (वय 45 रा.जळगाव), साळूबा गोरे (वय 65 रा.सावखेडा), शेषराव बाळाजी राऊत 9वय 65 रा.दनापूर ता.भोकरदन), हलीमाबी गफार खा 9वय 25 अजिंठा ता.सिल्लोड) आदी जखमींचे नावे आहेत.

रुग्णवाहिका खचाखच भरुन घटीला दाखल
फुलंब्री येथील महात्मा फुले रुग्णवाहिका चालक विजय देवमाळी यास सदर अपघातची माहिती मिळताच त्यांनी आपल्या तिन्ही रुग्णवाहिका घटनास्थळी हजर करुन जखमीना त्वरीत  घाटी दवाखाण्यात उपचारासाठी दाखल केले. या अपघात ग्रस्तांना चौका येथील सरपंच संतोष वाघ, ग्रामपंचायत सदस्य दत्तू साळवे, शंकर बोंगाणे, अजिनाथ पवार यांनी मदत कार्य केले. तसेच अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना उपचारासाठी मदत करुन वाहतुक सुरळीत केली.

Web Title: 43 injured in accident on Aurangabad-Jalgaon highway