जालना जिल्ह्यातील 45 मंडळात अतिवृष्टी

उमेश वाघमारे
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

जालना : जिल्ह्यात गुरुवारी (ता. 16) दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे शुक्रवारी (ता.17) सकाळी आठ वाजेपर्यंत पावसाच्या अकडेवारीनुसार यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यादांच जिल्ह्यातील चार मंडळ वगळता इतर 45 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. दरम्यान शुक्रवारी (ता.18) सकाळीपासून पावसाची भूरभूर सुरूच आहे.

जालना : जिल्ह्यात गुरुवारी (ता. 16) दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे शुक्रवारी (ता.17) सकाळी आठ वाजेपर्यंत पावसाच्या अकडेवारीनुसार यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यादांच जिल्ह्यातील चार मंडळ वगळता इतर 45 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. दरम्यान शुक्रवारी (ता.18) सकाळीपासून पावसाची भूरभूर सुरूच आहे.

यंदा पावसाळा सुरू झाल्यानंतर जालना जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली होती. मागील दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप धोक्यात आला होता. मात्र गुरूवारी (ता.16) जिल्ह्यात सर्वदूर दिवसभर पावसाची संतधार सुरू होती. परिणामी शुक्रवारी (ता.17) सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात 113.62 मिमी पावसाची नोंद झाली आहे. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेनुकाई मंडळात 62 मिमी, अनवा मंडळात 50 मिमी, धावडा मंडळात 32 मिमी तर परतूर तालुक्यातील वाटूर मंडळात 59 मिमी पाऊस झाला असून जिल्ह्यातील इतर 45 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. 

अतिवृष्टी झालेल्या मंडळांमध्ये जालना तालुक्यातील जालना मंडळात 146 मिमी, जालना ग्रामीण मंडळात 99 मिमी, विरेगाव मंडळात 140 मिमी, रामनगर मंडळात 155 मिमी, नेर मंडळात 95 मिमी, सेवली मंडळात 91 मिमी, पाचनवडगाव मंडळात 155 मिमी, वाघ्रुळ जहागीर मंडळात 180 मिमी, बदनापूर तालुक्यातील बदनापूर मंडळात 113 मिमी, रोषणगाव मंडळात 146 मिमी, दाभाडी मंडळात 169 मिमी, सेलगाव मंडळात 145 मिमी, बावणे पांगरी मंडळात 140 मिमी, भोकरदन तालुक्यातील भोकरदन मंडळात 99 मिमी, सिपोरा बाजार मंडळात 87 मिमी, हसनाबाद मंडळात 80 मिमी, राजूर मंडळात 145 मिमी, केदारखेडा मंडळात 156 मिमी, जाफराबाद तालुक्यातील जाफराबाद मंडळात 140 मिमी, टेंभूर्णी मंडळात 72 मिमी, कुंभारझरी मंडळात 102 मिमी, वरुड मंडळात 75 मिमी, माहोरा मंडळात 80 मिमी, परतूर तालुक्यातील परतूर मंडळात 130 मिमी, सातोना मंडळात 143 मिमी, आष्टी मंडळात 128 मिमी, श्रीष्टी मंडळात 211 मिमी, मंठा तालुक्यात मंठा मंडळात 134 मिमी, ढोकसाल मंडळात 115 मिमी, तळणी मंडळात 90 मिमी, पांगरी गोसावी मंडळात 125 मिमी, अंबड तालुक्यातील अंबड मंडळात 80 मिमी, धनगरपिंपरी मंडळात  78 मिमी, जामखेड मंडळात 78 मिमी, वडीगोद्री मंडळात 76 मिमी, गोंदी मंडळात 77 मिमी, रोहिलागड मंडळात 75 मिमी, सुखापुरी मंडळात 77 मिमी, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी मंडळात 127 मिमी, राणी उंचेगाव मंडळात 133 मिमी, रांजणी  मंडळात 190 मिमी, तीर्थापूरी मंडळात 133 मिमी, कुंभारपिंपळगाव मंडळात 105 मिमी, अंतरवाली टेंभी मंडळात 93 मिमी, जांभ  समर्थ मंडळात 84 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.

Web Title: 45 mandals in jalna have heavy rain