लातुरात फडकणार 45 मीटर उंचीचा राष्ट्रध्वज

विकास गाढवे 
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

लातूर : स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिना आणि राष्ट्रीय सणानिमित्त फडकावला जाणारा राष्ट्रध्वज देशाभिमान व देशभक्तीची जागृती करतो. राष्ट्रध्वजाला पाहूनच सर्वांना स्फुरण चढते. वर्षातील काही दिवसातील हे क्षण नागरिकांना रोज अनुभवता येणार आहेत.  

जिल्हा क्रीडा संकुलात सर्वाधिक उंचीच्या राष्ट्रध्वजाची उभारणी केली जाणार आहे. सुमारे 45 मीटर उंच खांबावर उभारल्या जाणाऱ्या हा राष्ट्रध्वज चोवीस फडकता राहणार आहे. केंद्र सरकारने त्यासाठी मंजूरी दिली असून लवकरच त्याची उभारणी पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी शुक्रवारी (ता. तीन) पत्रकार परिषदेत दिली.

मराठवाड्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या उंचीचा राष्ट्रध्वज उभारला जात असल्याचा दावाही त्यांनी केला. राष्ट्रध्वजाला पाहिल्यानंतर नागरिकांत राष्ट्रभावना वाढीस लागते. राष्ट्रीय सणानिमित्त होणाऱ्या ध्वजवंदनाच्या निमित्ताने नागरिकांत देशभक्ती जागृत होते. कोठेही राष्ट्रध्वज नजरेस पडला की देशभक्तीची जाणीव होते. नागरिकांत ही जाणीव कायम जागृत ठेवण्याच्या हेतूने मोठ्या उंचीचा राष्ट्रध्वज उभारणीची संकल्पना जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी मांडली असून त्याला पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दाद दिली. यामुळे मोठ्या उंचीच्या राष्ट्रध्वज उभारणीला केंद्र सरकारने मंजूरी दिली असून जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या वतीने या राष्ट्रध्वज उभारणीचे काम पूर्ण केले जाणार आहे. उंचीच्या प्रमाणात राष्ट्रध्वजही मोठा असणार असून तो चोवीस तास फडकत राहणार आहे.

जिल्हा क्रिडा संकुलात नागरिक मोठ्या संख्येने येतात. त्यांच्या नजरेस सातत्याने हा राष्ट्रध्वज येणार आहे. यामुळेच मोठ्या राष्ट्रध्वजासाठी जिल्हा क्रिडा संकुलातील स्थान निश्चित करण्यात आले आहे.  येत्या स्वातंत्र्य दिन किंवा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापर्यंत राष्ट्रध्वज उभारणीचे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा आडसूळ यांनी सांगितले. 

बालशिवाजी पार्कही उभारणार
लातूर शहरात तीन ते दहा वर्ष वयोगटातील मुलांना खेळण्या बागडण्यासाठी काहीच सुविधा नाहीत. या सुविधा देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे बालकांत साहस निर्माण करण्यासाठी क्रीडा संकुलातच बालशिवाजी अॅडव्हेंचर पार्कही उभारण्यात येणार आहे. सात हजार चौरस फुट क्षेत्रात या पार्कची उभारणी होणार आहे. रात्रीच्या वेळीही नागरिकांना व्यायाम करता यावा म्हणून फ्लड लाईटची सुविधा, टेनिसासाठी सिंथेटिक कोर्ट, आधुनिक बॅडमिंटन कोर्ट आदी सुविधाही उभारण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रीय क्रीडा दिवसापर्यंत (ता. 29) ही सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले.   

Web Title: 45 meters height tri colour flag at latur