नांदेडमधील 5 बालके बेपत्ता         

प्रल्हाद कांबळे
शनिवार, 22 डिसेंबर 2018

नांदेड : शहरातील इतवारा भागात असलेल्या मोमीन पुरा परिसरातून काल (ता. 22) सायंकाळी पाचच्या सुमारास शहरातील इतवारा भागात असलेल्या मोमिनपुरा परिसरातून काल शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पाच बालके बेपत्ता झाली आहे. नातेवाईकांनी व पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला असून अद्याप पर्यंत ही बालके सापडले नाहीत. या प्रकरणी इतवारा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी नामे महंमद शाह वय 40 वर्ष रा. मोमीनपुरा नांदेड यांच्या फिर्यादी वरून पोलिस ठाणे इतवारा गु.र. नं. 358/18 कलम 363 भा.द.वी. प्रमाणे गुन्हा नोंद केला. शबाज शाह (वय 10), अब्दुल मुबिन शाह (वय 9), शेख समीर कौसर (वय 9), मोहम्मद रेहान अब्दुल गफार (वय 10), सय्यद जुबेर इक्बाल (वय 8) सर्व राहणार मोमिनपुरा नांदेड हे सर्व काल (ता. 21) दुपारी चार वाजता गल्लीत खेळत असताना घरी परत आले नाहीत म्हणून त्याचा शोध घेतला असता ते सापडले नाहीत. तरी वरील मुलांना कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून  नेले आहे या वरून गुन्हा दाखल करून तपास सपोनी पठाण यांच्याकडे देण्यात आला आहे.

सदरील बालके सापडल्यास इतवारा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिस निरीक्षक साहेब राव नरवाडे यांनी केले आहे. 

Web Title: 5 child missing from Nanded