कंटेनरने चिरडल्याने पाच जण जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

ढोकी- भरधाव कंटेनरने चिरडल्याने पाच शेतकरी जागीच ठार झाले; तसेच दोन बैलांचा मृत्यू झाला. बार्शी-लातूर मार्गावर ढोकीजवळ रविवारी (ता.20) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. संतप्त नागरिकांनी पाठलाग करून दारूच्या नशेत असलेल्या चालकाला बेदम चोप देत कंटेनर पेटवून दिला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून चालकाला ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बार्शीकडून भरधाव कंटेनर लातूरकडे निघाला होता. ढोकी शिवारातील राजाराम बाजीराव काळे (वय 70) व याकूब पठाण (वय 65, दोघेही रा. ढोकी, ता. उस्मानाबाद) हे शेतातील कामे आटोपून बैलगाडीने गावाकडे निघाले होते. या वेळी कंटनेरने बैलगाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या घटनेत बैलगाडीतील दोघांसह दोन्ही बैलांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पळ काढण्याच्या प्रयत्नात भरधाव कंटेनरने ढोकी येथे इतर तिघांनाही चिरडले. त्यानंतर संतप्त जमावाने पाठलाग करत चालकाला चोप देत कंटेनर पेटवून दिला.

Web Title: 5 dead in accident at dhoki