मराठवाड्यात ५ शेतकऱ्यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

परभणी, बीड - नापिकी, कर्जबाजारीमुळे मराठवाड्यात आत्महत्येचे सत्र सुरूच असून गेल्या चोवीस तासात पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 

सुरताबाई तांडा येथे रविवारी सकाळी नापिकीला कंटाळून विष्णू हरिभाऊ राठोड (वय ५०) या शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या घटनेत बोबडे टाकळी (ता. परभणी) येथे पंढरी निवृत्तीराव बोबडे (वय ३२) यांनी शनिवारी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर बॅंकेचे कर्ज होते. 

तिसरी आत्महत्या कळंब तालुक्‍यातील आहे. डिकसळ येथील मधुकर विठ्ठल अंबीरकर (वय ६४) यांनी शनिवारी सायंकाळी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. नापिकी आणि कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते.

एकाने घेतले विष 
गेवराई - तालुक्‍यातील खांडवी येथे विनायक विश्वनाथ नाईकवाडे (वय ३६) यांनी नापिकीला कंटाळून रविवारी (ता. २६) शेतात विष घेऊन आत्महत्या केली. दुष्काळी स्थितीमुळे शेतात पुरेसे उत्पन्न होत नव्हते. यामुळे त्यांनी काही वर्षे ऊसतोडणीचे कामही केले; परंतु यंदा पिके धोक्‍यात आल्याने त्यांनी टोकाचा निर्णय घेतला. 

एकाने घेतले जाळून 
जालना - तालुक्‍यातील माळशेंद्रा येथे आत्माराम रघुनाथ कापसे (वय ३०) यांनी कर्जाला कंटाळून स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केली. मजुरी करणारे कापसे यांच्यावर बॅंकेसह खासगी व एका फायनान्स कंपनीचे कर्ज होते. या विवंचनेत त्यांनी १९ ऑगस्टला घरात अंगावर रॉकेल घेऊन स्वत:ला पेटवून घेतले. यानंतर त्यांच्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शनिवारी (ता. २५) रात्री त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: 5 farmer Suicide in Marathwada