उस्मानाबाद- बसचा भीषण अपघात; 5 ठार, 15 जखमी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

उस्मानाबाद : पुणे - हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर राज्य परिवहन महामंडळाची बस आणि एक खासगी बस यांच्यात भीषण अपघात झाला. यामध्ये 5 जण ठार, तर किमान 15 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमरग्याजवळील येनेगूर गावाजवळ आज (शुक्रवार) सकाळी हा अपघात झाला. उमरगा- नळदुर्ग रस्त्यावर दोन्ही बसची समोरासमोर धडक झाली. उमरगा तालुक्याच्या डेपोची बस सोलापूरच्या दिशेने जात होती, तर कर्नाटकची बस उमरग्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी हा अपघात झाल,. 

हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही बसचे चालक यामध्ये मृत्युमुखी पडले आहेत. तसेच, बसमधील प्रवाशांसह एकूण 15 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 
Web Title: 5 killed, 15 injured in accident near osmanabad