काकासाहेब शिंदेंच्या कुटुंबीयांना जि. प.कडून पाच लाखांची मदत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेले काकासाहेब शिंदे यांच्या प्रथम स्मृतिदिनी मंगळवारी (ता. 23) जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांच्या कुटुंबाला जाहीर करण्यात आलेल्या रकमेपैकी पाच लाख रुपयांची रोख मदत सुपूर्त करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांच्या हस्ते मदत शिंदे कुटुंबीयांना देण्यात आली.

औरंगाबाद - मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेले काकासाहेब शिंदे यांच्या प्रथम स्मृतिदिनी मंगळवारी (ता. 23) जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांच्या कुटुंबाला जाहीर करण्यात आलेल्या रकमेपैकी पाच लाख रुपयांची रोख मदत सुपूर्त करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांच्या हस्ते मदत शिंदे कुटुंबीयांना देण्यात आली.

औरंगाबाद-पुणे महामार्गावरील कायगाव टोका येथील गोदावरी नदीच्या "हुतात्मा काकासाहेब शिंदे सेतू'वर त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी कायगाव टोका येथे उभारलेल्या त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डोणगावकर, उपाध्यक्ष केशवराव तायडे, जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे गटनेते अविनाश गलांडे, कृष्णा पाटील डोणगावकर उपस्थित होते.

डोणगावकर म्हणाल्या, 'सभागृहात दहा लाख रुपये देण्याचा निर्णय झाला. मात्र, यासाठीचे लेखाशीर्ष नसल्याने मंजुरीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. लालफितीत हा प्रस्ताव अडकल्याने ही मदत देण्यासाठी उशीर होत आहे. मात्र, आम्ही जिल्हा परिषदेचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी मिळून ही पाच लाखांची मदत दिली आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5 Lakh Rupees Help to Kakasaheb Shinde Family by ZP