हुतात्मा मोरती राजेमोड यांच्या कुटूंबियास पाच लाखाचा निधी

nanded
nanded

नांदेड : भोकर तालुक्यातील पांडूरणा येथील हुतात्मा जवान मोरती राजेमोड यांच्या कुटूंबियाना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाच लाखाच्या धनादेशाचे वितरण गुरूवारी (ता. 7) मुंबई येथे देण्यात आला. यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने पाठपुरावा केला होता. 

हुतात्मा जवान मारोती कोंडीबा राजेमोड हे देशाचे रक्षण करताना 2018 मध्ये हुतात्मा झाले होते. त्यानंतर त्यांचे पार्थिव विशेष विमानाने नांदेडमार्गे मूळ गावी पांडुरणा येथे नेण्यात आल होते. त्यानंतर या कुटूंबियांवर फार मोठे संकट कोसळले होते. परंतु येथील जिल्हा सैनिक कार्यालयाने त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करून अखेर मुख्यमंत्री यांच्या निधीतून पाच लाख रुपये मंजुर करून घेतले.

सैनिक कल्याण कार्यालयाचे समन्वयक कमलाकर शेटे यांनी वीर पत्नी प्रभावती राजेमोड व हुतात्मा राजेमोड यांचे आई व वडील यांना सोबत घेऊन मुंबई गाठली. या कुटूंबियांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत केली. मुख्यमंत्री यांच्या वर्षा या शासकिय बंगल्यावर आयोजित एका कार्यक्रमात हा धनादेश देण्यात आला.

आपल्या परिवासारासोबत राज्य सरकार असलेल्याची ग्वाही मुख्यंत्र्यांनी या कुटूंबियाना दिली. यावेळी माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी निलंगेकर, सैनिक कल्याण विभागाचे संचालक दीपक नलावडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टंट कमांडर ओम कापले, कॅप्टन रत्नपारखी, समन्वयक कमलाकर शेटे, नांदेड व पांडुरणा व भोकर येथील प्रतिष्ठीत नागरिक या कार्यक्रमात उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com