पाच महिन्यात १३९४ वीजचोऱ्या, १८ लाखांची वसुली

प्रल्हाद कांबळे 
मंगळवार, 19 जून 2018

नांदेड :‍ वीज गळती रोखण्याच्या उद्देशाने महावितरणच्या नांदेड परिमंडळाच्यावतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेत नांदेड परिमंडळात तब्बल एक हजार ३९४ वीज चोऱ्या उघडकीस आल्या आहेत. यातील २८६ वीजग्राहकांकडून १८ लाख रूपयांची वसुली करण्यात आली आहे. तसेच २१८ वीजचोरांवर वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

नांदेड :‍ वीज गळती रोखण्याच्या उद्देशाने महावितरणच्या नांदेड परिमंडळाच्यावतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेत नांदेड परिमंडळात तब्बल एक हजार ३९४ वीज चोऱ्या उघडकीस आल्या आहेत. यातील २८६ वीजग्राहकांकडून १८ लाख रूपयांची वसुली करण्यात आली आहे. तसेच २१८ वीजचोरांवर वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरीया यांच्या निर्देशानुसार वीजचोरीस आळा घालण्याच्या दृष्टीने आखण्यात आलेल्या मोहिमेत परिमंडळातील नांदेड जिल्ह्यातील ७१७ तर हिंगोली जिल्ह्यात ४६७ तसेच परभणी जिल्ह्यातील २१० वीजचोऱ्या जानेवारी ते मे २०१८ या पाच महिन्याच्या कालावधीत उघड झाल्या आहेत. 

यापैकी २८६ वीजग्राहकांकडून वीजचोरीची १८ लाखांची वसुली करण्यात महावितरणला यश प्राप्त झाले आहे. या वीज चोऱ्यामध्ये सर्वाधिक वीजचोरी ही आकडे टाकून वीज वापरल्याची आहे. नांदेडमध्ये ३२५, परभणीत १८१ तर हिंगोलीमध्ये सर्वाधिक ४३६ वीजचोऱ्या आकडे टाकून करण्यात आल्या आहेत. या वीजग्राहकांवरती वीज कायद्यानुसार कारवाई करत वीजचोरीची रक्कम वसूल करण्यात आली आहे. तर १२१ वीजचोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

मीटर मध्ये छेडछाड करणे, तसेच मीटर बायपास करून वीजवापरणे अशा प्रकारे वीजचोरी उघड झालेल्या नांदेड मंडळातील २९७, हिंगोली मंडळातील २० आणि परभणी मंडळातील ८१ वीजग्राहकांवरती वीजकायदा कलम १३५ अन्वये वीज चारीचा गुन्हा नोंद करुन १४४ वीजचोरांकडून ११ लाख चार हजार रूपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. तसेच एकूण ९७ वीजग्राहकांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. वीजचोरी व दंडाची रक्कम  अशी एकूण २८ लाख ४० हजार रूपयांची देयके ८७८ वीज चोरी केलेल्या वीजग्राहकांना वीतरीत करण्यात आली असून संबंधीत रक्कम वसुल करण्याची कारवाई सुरू आहे.
 

Web Title: 5 months of 1394 electricity, 18 lakhs of recoveries