क्‍लासचालक खून प्रकरणी 5 जणांना कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

लातूर - येथील "स्टेप बाय स्टेप क्‍लासेस'चे संचालक अविनाश चव्हाण यांचा गोळी झाडून खून केल्या प्रकरणात अटकेत असलेल्या पाच जणांना बुधवारी (ता. 27) येथील मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर उभे करण्यात आले. त्यांना तीन जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. शहरात गेल्या रविवारी (ता. 24) मध्यरात्रीनंतर ही खुनाची घटना घडली होती. पोलिसांनी चोवीस तासांत केलेल्या तपासात चव्हाण यांचा एकेकाळचा भागीदार प्रा. चंदनुकमार शर्मा हा "मास्टर माइंड' असल्याचे पुढे आले. चव्हाण व प्रा. शर्मा हे एके काळचे क्‍लासेसचे भागीदार होते. 

Web Title: 5 people police custody in avinash chavan murder case

टॅग्स