अवैध वाळू उपसा करणारी पाच ट्रॅक्टर पकडले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

गेवराई (बीड) : तालुक्यातील आगर नांदूर व संगम जळगाव या ठिकाणी अवैध वाळू उपसा करुन वाहतूक करण्याचा प्रकार बुधवारी (ता. १६) महूसल पथकाच्या छाप्यात उघड झाला. पथकाने पाच ट्रॅक्टर (किंमत 30 लाख रुपये) मुद्देमाल जप्त केला. 

गेवराई तालुक्यातील आगर नांदूर आणि संगम जळगाव येथील नदीपात्रातून बेकायदा वाळू उपसा होतो. याकडे महसूल यंत्रणेची डोळेझाक असते. मात्र, गेल्या आठवड्यात विभागीय आयुक्तांनी तहसिलदार संजय पवार यांना नोटीस बजावल्यानंतर वाळू उपशावर कारवयांचे सत्र सुरु झाले आहे. बुधवारी उपविभागीय अधिकारी उदमले यांच्या सह महसूलच्या कर्मचाऱ्यांनी या दोन्ही ठिकाणी छापे टाकून कारवाईत वाळूसह एकुण 30 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. 

पहाटे झालेल्या कारवाईत प्रभारी तहसीलदार अभय जोशी, मंडळ अधिकारी  तांबरे, महसूल कर्मचारी काशिद, कुरूलकर, नालमे, देशमुख आदींनी ही कारवाई केली. दरम्यान, याच ठिकाणी एक टिप्परही ताब्यात घेण्यात आले असून ते अंबड तहसीलच्या स्वाधीन करण्यात आले. 
 
Web Title: 5 tractors caught for illegal soil