फुलंब्रीतील 5 गावे दमदार पावसाच्या प्रतीक्षेत 

नवनाथ इधाटे
रविवार, 1 जुलै 2018

फुलंब्री : तालुक्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस पडला असला तरी वडोद बाजार जिल्हा परिषद सर्कलमधील पाच-सहा गावात दमदार पाऊस पडला नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. येथील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

फुलंब्री : तालुक्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस पडला असला तरी वडोद बाजार जिल्हा परिषद सर्कलमधील पाच-सहा गावात दमदार पाऊस पडला नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. येथील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

फुलंब्री तालुक्यात 92 गावे असून सुमारे पन्नास हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांची संख्या आहे. तसेच तालुक्यात सुमारे 56 हजार हेक्टर क्षेत्र खरिपाच्या लागवडी योग्य आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाची सुरुवात झाली. फुलंब्री शहर परिसरात सातत्याने पावसाचे प्रमाण चांगले राहिले. त्यानंतर हळूहळू जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यत संपूर्ण फुलंब्री तालुक्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने बहुंश शेतकऱ्यांची पेरणी सुरु आहे. तर काही शेतकऱ्यांची पेरणी आटोपून निंदनी खुरपणी सुरु आहे. परंतु तालुक्यातील वडोद बाजार जिल्हा परिषद सर्कल मधील निमखेडा, रिधोरा या गावामध्ये सुमारे 50 टक्के पेरणीची लागवड झालेली आहे. तर याच परिसरात असलेल्या गेवराई गुंगी, गेवराई पायगां या दोन गावात नांगराट केलेले ढेकळे सुद्धा फुटले नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

रोहीण्याच्या पाठोपाठ मृग नक्षत्र या परिसरात कोरडे ठाक गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. तालुक्यात बहुतांश ठिकाणी पेरणी झाल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहे. एका-पाठोपाठ एक दिवस कोरडाच जात असल्याने नेमके काय करावे शेतकऱ्यांना सूचत नाही. यंदा चांगला पाऊस पडेल या आशेवर शेतकऱ्यांनी बी-बियाणे भरून शेतीचे मशागतीचे काम करून ठेवले आहे. मात्र पाऊसच पडत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. तसेच तालुक्यात बहुतांश ठिकाणी दमदार पाऊस झाला नसल्यामुळे भरपावसाळ्यात ग्रामस्थांना पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरविले जात आहे. यंदा तालुक्यातील नागरिकांची तहान भागवताना प्रशासनाला चांगल्याच कसोटीचा सामना करावा लागला.  

तालुक्यात काही भागात दमदार तर काही भागात पेरणी योग्य पाऊस झाल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांची पेरणी झालेली आहे. परंतु गेवराई गुंगी, गेवराई पायगा, टाकळी कोलते, रिधोरा, निमखेडा या भागात पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहे. त्यामुळे प्रशासनाने या भागातील शेतकऱ्यांना विशेष सवलत देऊन विविध योजनेचा तात्काळ लाभ द्यावा.
- अमोल डकले, सरपंच गेवराई गुंगी 
 

Web Title: 5 villages in phulambri waiting for rain