पाचशे, हजारच्या नोटांना अलविदा!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - पाचशे, हजार रुपयांच्या नोटांवर बंदीनंतर औरंगाबादमध्ये तीन हजार कोटींहून अधिक चलनातून हद्दपार झालेल्या नोटा राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंकांत जमा झाल्याचा अंदाज आहे. नव्या नोटांसह जुन्या नोटा ठेवण्यास करंसी चेस्टमध्ये जागा शिल्लक नाही. त्यामुळे अनेक बॅंकांच्या एकत्र मिळून कोट्यवधी रुपयांच्या नोटा सोमवारी (ता. 21) नागपूरच्या रिझर्व्ह बॅंकेकडे रवाना झाल्या आहेत.

औरंगाबाद - पाचशे, हजार रुपयांच्या नोटांवर बंदीनंतर औरंगाबादमध्ये तीन हजार कोटींहून अधिक चलनातून हद्दपार झालेल्या नोटा राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंकांत जमा झाल्याचा अंदाज आहे. नव्या नोटांसह जुन्या नोटा ठेवण्यास करंसी चेस्टमध्ये जागा शिल्लक नाही. त्यामुळे अनेक बॅंकांच्या एकत्र मिळून कोट्यवधी रुपयांच्या नोटा सोमवारी (ता. 21) नागपूरच्या रिझर्व्ह बॅंकेकडे रवाना झाल्या आहेत.

औरंगाबादमध्ये पाच बॅंकांकडे करंसी चेस्ट आहेत. या बॅंकांमध्ये नऊ ते 19 नोव्हेंबरदरम्यान तीन हजार कोटींपेक्षा अधिक पाचशे, हजार रुपयांच्या नोटा जमा झाल्याचा अंदाज आहे. मोठ्या प्रमाणात नोटांचा ओघ आल्याने या नोटा कुठे ठेवायच्या? हे प्रश्‍नचिन्ह बॅंक अधिकाऱ्यांसमोर होते. या नोटा रिझर्व्ह बॅंकेकडे पाठविण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता.

मात्र, या नोटा रिझर्व्ह बॅंकेकडे पाठविण्यापूर्वी वेगळ्या कराव्या लागणार होत्या. त्यानंतर दहा, शंभरच्या नोटांनंतर एक पेटी तयार करावी लागते. हे काम बॅंक कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र केले. त्यानंतर या नोटा रिझर्व्ह बॅंकेकडे नागपूरला रवाना करण्यात आल्या. आता रिकाम्या होत असलेल्या पाच करंसी चेस्टना नव्या नोटांची प्रतीक्षा आहे. 2000च्या नोटा उपलब्ध झाल्यानंतर आता लवकरच पाचशे रुपयांची नोट दाखल होईल, अशी अपेक्षा बॅंकेतील अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली.

एटीएम कोरडेठाक
शहरातील राष्ट्रीयीकृत आणि खासगी बॅंकांची निम्मी एटीएम यंत्रे अपडेट झाली आहेत. त्यामुळे शुक्रवारपासून 2000 रुपयांची नोट एटीएममधून मिळायला सुरवात झालेली आहे. मात्र, बॅंकांच्या तिजोऱ्यांना मुबलक प्रमाणात दहा, वीस, पन्नास, शंभर, पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटांची प्रतीक्षा आहे. खातेधारकांनाच पैसे देण्यासाठी बॅंकांना पुणे, मुंबई आणि नाशिकच्या बॅंकांची मदत घ्यावी लागली. त्यामुळे "एटीएम'च्या एजन्सीधारकांना कुठून पैसे देणार? त्यामुळे एटीएम अपग्रेड असले तरीही मुबलक पैशाअभावी निम्म्याहून अधिक एटीएम कोरडे पडलेले होते.

येथे गर्दी कायम
स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद (शहागंज, सिडको), स्टेट बॅंक ऑफ इंडिया (सिडको, दूध डेअरी चौक), बॅंक ऑफ महाराष्ट्र (सिडको, शहागंज, विद्यापीठ, टीव्ही सेंटर), एचडीएफसी (आकाशवाणी) आणि आयडीबीआय (सेव्हन हिल) या बॅंकांमध्ये चौदाव्या दिवशी नोटा एक्‍स्चेंज आणि डिपॉझिट करण्यासाठी गर्दी कायम असल्याचे दिसून आले.

Web Title: 500, 1000 rupess currency dismis