‘स्वाराती’मध्ये वर्षभरात जन्मल्या ४,९१६ मुली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 जानेवारी 2019

अंबाजोगाई - स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र विभागात वर्षभरात (२०१८) दहा हजार ५०७ प्रसूती झाल्या. त्यात ४९१६ मुली; तर ५५९१ मुले जन्मली. विशेष म्हणजे यात १११ जुळ्यांचाही जन्म झाला.

वर्षभरात झालेल्या प्रसूतींपैकी ६५५६ प्रसूती नॉर्मल, तर ३९५१ प्रसूती या सिझेरिअन शस्रक्रियाने झाल्या. या प्रसूतीबरोबरच एक हजार ९०० कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया झाल्या. त्यात कुटुंब नियोजनाच्या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियाही सुरू झाल्या. गर्भ पिशवीच्या ५०० अवघड, तर दोन हजार छोट्या शस्त्रक्रिया झाल्या.

किचकट शस्त्रक्रियांत यश
स्त्रीरोग विभागात विविध प्रकारच्या अवघड व किचकट शस्त्रक्रिया करण्यातही डॉक्‍टरांना यश आले. महिलांच्या पोटातील विविध आकारांच्या व वजनाच्या गोळ्यांच्या शस्त्रक्रियांचा त्यात समावेश आहे. महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेंतर्गत २६२ शस्त्रक्रिया केल्यामुळे ५० लाखांचा निधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या औषध सामग्रीसाठी जमा झाला. विभागात विभागीय स्तरावर चर्चासत्र व कार्यशाळाही झाली. या विभागाने चार आंतरराष्ट्रीय प्रकाशने व चार शोधनिबंध सादर केले.

मनातून सेवा देण्याचे काम केल्यामुळे हे शक्‍य झाले. विशेष म्हणजे या विभागातील सर्व निवासी, प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर व परिचारिकांचेही यात योगदान आहे. अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांचे मार्गदर्शन होते. विभागात गरोदर मातांना सन्मानपूर्वक वागणूक देण्याचाही पुरेपूर प्रयत्न केला जातो. 
- डॉ. संजय बनसोडे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5000 girl born in last year