जिल्ह्यात करापोटी 50.67 कोटींची वसुली 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

बीड - 2016-17 या वर्षासाठी महसुली करवसुलीत जिल्ह्याला 64 कोटी 9 लाखांचे उद्दिष्ट मिळाले होते. उद्दिष्टाच्या तुलनेत शुक्रवारपर्यंत (ता. 17) 50 कोटी 67 लाख म्हणजेच 79 टक्के इतकी वसुली झाली आहे. महसुल वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उर्वरित दीड महिन्यात 21 टक्के म्हणजेच 14 कोटींची वसुली करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे. वसुलीमध्ये औरंगाबाद विभागात बीड जिल्हा द्वितीय क्रमांकावर असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली. 

जिल्ह्याला महसुली करवसुलीचे 64 कोटी 9 लाख 5 हजार रुपये इतके उद्दिष्ट विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मिळाले होते. यामध्ये जमीन महसूल करापोटी 13 कोटी 39 लाख 50 हजार इतके उद्दिष्ट मिळाले होते. जमीन महसुलाची उद्दिष्टपूर्ती तर साध्य झालीच, शिवाय उद्दिष्टापेक्षाही जास्तीची वसुली करण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. आतापर्यंत 16.43 लाख 87 हजार म्हणजेच 122 टक्के इतकी वसुली झाली आहे. याशिवाय जिल्ह्याला करमणूक करवसुलीचे 4.70 कोटींचे उद्दिष्ट मिळाले होते. यामध्ये आतापर्यंत 2 कोटी 93 लाख 75 हजार रुपये म्हणजेच 62.50 टक्के इतकी वसुली झाली आहे. याशिवाय गौणखनिज वसुलीचे तब्बल 46 कोटींचे उद्दिष्ट मिळाले होते. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात जिल्ह्यात एकाही वाळूपट्ट्याचा लिलाव झालेला नसतानाही आतापर्यंत अवैध वाळू उपसा करणाऱ्यांकडून तसेच वाळूची अवैध वाहतूकप्रकरणी लावलेल्या दंडापोटी आजघडीला 31 कोटी 69 लाख 58 हजार म्हणजेच 68.90 टक्के इतकी वसुली साध्य झाली आहे. एकूण उद्दिष्टापैकी आतापर्यंत 50 कोटी 67 लाख 69 कोटी म्हणजेच 79.07 टक्के इतकी वसुली झाली आहे. अद्यापही दीड महिना कालावधी बाकी असून या कमी कालावधीत उद्दिष्टपूर्तीचे लक्ष्य गाठण्यासाठी 14 कोटींची वसुली करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. उर्वरित दीड महिन्यात महसूल वसुलीची उद्दिष्टपूर्ती होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी सांगितले. 

औरंगाबाद विभागाचा महसूल वसुलीचा आढावा 
जिल्हा ः एकूण उद्दिष्ट- आतापर्यंतची वसुली- टक्केवारी- 
बीड ः 64 कोटी 9 लाख 50 हजार- 50 कोटी 67 लाख 69 हजार- 79.07 
औरंगाबाद ः 117 कोटी 81 लाख 73 हजार- 81 कोटी 2 लाख 26 हजार- 68.77 
जालना ः 41 कोटी 47 लाख 91 हजार- 23 कोटी 82 लाख 82 हजार- 57.45 
परभणी ः 50 कोटी 59 लाख 78 हजार- 28 कोटी 39 लाख 56 हजार- 56.12 
हिंगोली ः 27 कोटी 83 लाख 16 हजार- 10 कोटी 74 लाख 74 हजार- 38.62 
लातूर ः 55 कोटी 35 लाख 98 हजार- 27 कोटी 92 लाख 55 हजार- 50.44 
उस्मानाबाद ः 43 कोटी 27 लाख 90 हजार- 43 कोटी 14 लाख 97 हजार- 99.70 

Web Title: 50.67 crore in tax collection district