बीड जिल्ह्यात तरुणांनी उभारले नवे ५१२ उद्योग

Business
Business

बीड - नोकऱ्या अन्‌ शेतीतून उत्पन्न नसल्यामुळे मराठा समाजाची वरचेवर पीछेहाट होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेमुळे जिल्ह्यात नवीन ५१२ व्यवसाय उभारले आहेत. यातील ३१५ व्यावसायिकांना व्याज परताव्याचे ३० लाख रुपयेही मिळाले आहेत.

सुरवातीला खेटे मारूनही बॅंकांकडून अडवणूक आणि कर्जाला नकार दिला जात असताना महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व व्याज परतावा योजनेने जिल्ह्यात चांगलेच बाळसे धरले आहे. सद्यःस्थितीत बॅंकांकडे एक हजार ३५५ कर्जप्रकरणे सादर झाली असून, यातील ५१२ प्रकरणे मंजूर करत बॅंकांनी व्यावसायिकांना तब्बल १७ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. यातून विविध व्यवसाय उभारले गेले आहेत. 

विशेष म्हणजे, महामंडळाने कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या आणि कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या ३१५ लाभार्थींना ३० लाख रुपयांचा व्याज परतावा त्यांच्या खात्यावर जमा केला आहे. 

मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरल्यानंतर समाजातील व्यवसाय इच्छुकांना बॅंकेकडून कर्ज मिळावे आणि व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचे व्याज शासनाने भरावे अशी योजना मागच्या वर्षी शासनाने हाती घेतली. यानुसार महामंडळाच्या वतीने वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना हाती घेण्यात आली. याअंतर्गत वैयक्तिक व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थींचे १२ टक्‍क्‍यापर्यंतचे व्याज महामंडळ अदा करणार आहे. 

या योजनेत आतापर्यंत जिल्ह्यातील ५१२ व्यावसायिकांना बॅंकांनी १७ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. तर, नियमित परतफेड करणाऱ्या आणि कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या ३१५ लाभार्थींच्या खात्यावर महामंडळाने व्याज परताव्याची ३० लाख रुपयांची रक्कम जमा केली आहे.

नियमित कर्जाची परतफेड करून कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्यांच्या खात्यावर व्याज परताव्याचे ३० लाख रुपये मिळाले आहेत. उर्वरित कर्जदार व्यावसायिकांनी कागदपत्रांची पूर्तता करावी. 
- कालिदास थावरे, जिल्हा समन्वयक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com