Coronavirus : लातूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर; एकाच दिवशी ५३ पॉझिटिव्ह

53 new cases of COVID-19 in Latur District
53 new cases of COVID-19 in Latur District

लातूर :  जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात गुरुवारी (ता. नऊ) आतापर्यंतच्या एका दिवसात सर्वाधिक रुग्ण आढळण्याचा विक्रम झाला. एकाच दिवसात ५३ जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात  बुधवारी प्रलंबित असलेल्या सहापैकी तिघांच्या अहवालाचाही समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या आता ६२२ वर गेली आहे.

येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत गुरुवारी ३९२ जणांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी आले होते. त्यापैकी ५३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. २७१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ४३ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. तिघांचे नमुने रिजेक्ट करण्यात आले आहेत. २२ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. एकाच दिवशी ५३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दरम्यान, बुधवारच्या सहा प्रलंबित अहवालांपैकी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या ६२२ वर गेली आहे. २७१ जणांवर उपचार सुरू असून, ३२२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर २९ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. गुरुवारच्या ५३ पॉझिटिव्ह पैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील १४, महापालिका १५, उदगीर ११, अहमदपूर ५, निलंगा सहा, औसा येथील दोन रुग्णांचा समावेश आहे. बुधवारी प्रलंबित असलेल्या सहा पैकी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, ते एमआयडीसीतील आहेत.

बोरोळ येथे परिचारिकेला कोरोनाची बाधा 

बोरोळ  : येथील एक महिला देवणीतील एका खासगी रुग्णालयात परिचारिका आहे. तिच्या कोरोना चाचणीचा अहवाल बुधवारी (ता. आठ) रात्री पॉझिटिव्ह आला. दरम्यान, देवणी तालुक्यातील हा दुसरा रुग्ण आहे. बाधित रुग्ण आढळलेला परिसर संपूर्णपणे सील करण्यात आला आहे. बाधित महिला रोज देवणी येथे बससेवा बंद असल्याने मिळेल त्या वाहनाने ये-जा करीत होती. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढला आहे. दरम्यान, उपजिल्हाधिकारी विकास माने यांनी गुरुवारी (ता. नऊ) येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार सुरेश घोळवे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, तलाठी डी. डी. ननावरे, सरपंच ललिता जवळदापके, ग्रामविकास अधिकारी राजेश मेनकुदळे उपस्थित होते. कोरोनाबाधित महिलेच्या कुटुंबातील नऊ व संपर्कातील सोळा अशा पंचवीस जणांना देवणी येथील कोरोना केअर सेंटरमधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग कलंबरकर यांनी दिली. 
 
कोरोना मीटर

  • एकूण बाधित - ६२२
  • उपचार सुरू - २७१
  • बरे झालेले - ३२२
  • मृत्यू - २९

 
(संपादन : विकास देशमुख) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com