पर्यटन विकासासाठी ५५० कोटी मंजूर

Fund
Fund

औरंगाबाद - जिल्ह्यातील म्हैसमाळ, खुलताबाद, सूलिभंजन विकास आराखड्याअंतर्गत ४३८ कोटी रकमेचा निधी मंजूर करण्यात आला असून, टप्प्याटप्प्याने तो त्या ठिकाणच्या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी देण्यात येणार आहे. तसेच ११२ कोटी रकमेच्या घृष्णेश्वर विकास आराखड्यास शासनाने मंजुरी दिली. या माध्यमातून विविध विकास कामे केली जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यटन मित्र समितीची बैठकीत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली.

जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘अजिंठा, वेरूळ या जगविख्यात पर्यटनस्थळांमुळे जागतिकस्तरावर ओळख असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात इतरही अनेक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक पर्यटनस्थळे आहेत. जिल्ह्यातील या सर्व विविध पर्यटनस्थळांचा विकास करून जास्तीत-जास्त संख्येने देशी, परदेशी पर्यटकांना येथील पर्यटनस्थळांची माहिती होण्यासाठी, येथील पर्यटन व्यवसायाला व्यापकस्तरावर गतिमान करण्याच्या दृष्टीने प्रशासनामार्फत विविध उपक्रम सुरू आहेत. त्या अंतर्गत पर्यटन मित्र ही संकल्पना राबवण्यात येत आहे.

यामध्ये सर्वांनी भाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी नियोजन अधिकारी विजय पवार, एमटीडीसीचे विभागीय व्यवस्थापक विजय जाधव, मानसिंग पवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पर्यटन विभागाचे प्रमुख डॉ. राजेश रगडे, पक्षीमित्र डॉ. दिलीप यार्दी उपस्थित होते.

मनोरंजनाचीही व्यवस्था हवी
पर्यटकांसाठी पुस्तक, घडीपुस्तिकांच्या माध्यमातून पर्यटनस्थळांची विस्तृत माहिती मिळावी, असे मत उद्योजक मुकुंद भोगले यांनी बैठकीत मांडले. औरंगाबाद पर्यटनाच्या व्यापक प्रसार-प्रसिद्धीसाठी येथील पर्यटन व्यवसायाच्या प्रगतीसाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि रात्रीच्या वेळी पर्यटकांच्या मनोरंजनासाठी चांगली सुविधा, कला सादरीकरण यांसारखी व्यवस्थाही असावी, असे उद्योजक ऋषी बागला यांनी सुचविले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com