esakal | हिंगोलीत लोकअदालतीत ५७ प्रकरणे निकाली, तीन कोटी ४१ लाख २ हजार ११६ रुपयाची तडजोड
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

या कार्यक्रमाचे उदघाटन बार काँन्सिल आँफ इंडियाचे उपाध्यक्ष अँड सतीश देशमुख यांचे हस्ते करण्यात आले .

हिंगोलीत लोकअदालतीत ५७ प्रकरणे निकाली, तीन कोटी ४१ लाख २ हजार ११६ रुपयाची तडजोड

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : येथील जिल्हा न्यायालय व त्या अंतर्गत येणाऱ्या विविध न्यायालयात जिल्हा विधी सेवाप्वराधीकरण व  वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता. १२) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन जिल्हा न्यायाधीश पी. व्ही . बुलबुले यांच्या मार्गर्शनाखाली जिल्हा न्यायालय परिसरात करण्यात आले होते. या लोक अदालतीत ५७  प्रकरणे निकाली निघाली असून तडजोडअंती तीन कोटी ४१ लाख २ हजार ११६ रुपयाचा महसुल प्राप्त झाला. या लोकअदालतीचे  उदघाटन बार काँन्सिल आँफ इंडियाचे उपाध्यक्ष अँड सतीश देशमुख यांचे हस्ते करण्यात आले .

कार्यक्रमाचे अध्यक्ष एन. बी. शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे  जिल्हा वकील संघाचे आर. एच. शिंदे व जिल्हा न्यायाधीश पी. व्ही . बुलबुले, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यु. एन. पाटील, दिवाणी न्यायाधीश क.स्तरचे व्ही. व्ही. निवघेकर, सरकारी अभियोक्ता श्री. दराडे, सरकारी वकील एन. एन. मुटकुळे, श्री.चोरमारे  उपस्थित होते. अँड. देशमुख यांनी प्रकरणे जास्तीत तडजोडी आधारे मिटावीत असे आवाहन केले. तसेच एन. बी. शिंदे, जिल्हा न्यायाधीश व आर.एच. शिंदे यांनी  प्रकरणे मिटविण्याचे आवाहन वकीलांना व पक्षकारांना केले. कार्यक्रमास वकील संघाचे सर्व सदस्य, बँकेचे अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी व पक्षकार उपस्थित होते. लोकअदालतीमध्ये मोटार अपघात प्रकरणे प्रथमच हिंगोली न्यायालयात तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते .

लोकअदालतमध्ये ३६२ प्रलंबीत भुसंपादन व मोटार अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे , तहजोडयुक्त फोजदारी प्रकरणे , कौटुंबीक वाद प्रकरणे, अपराध नियम असे १३८  प्रकरणातील  खटले तहजोडीसाठी तसेच बैंका व एम.एस.इ.बी. कंपन्यांची ९२८ प्रकरणे ठेवण्यात आलेली होती. लॉकडाऊन नंतर प्रथमच झालेल्या लोकअदालतीला पक्षकार व विधीज्ञ यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवून जास्तीत जास्त प्रकरणात समेट घडवून आणली व लोक अदालत यशस्वी करून लाभ घेतलेला आहे. लोक अदालतमध्ये ठेवलेल्या प्रकरणापैकी ५७ प्रकरणे राष्ट्रीय लोक न्यायालयात निकाली निघाली.  लोक अदालतीमध्ये तीन कोटी ४१ लाख २ हजार ११६ रुपयाची तडजोड करण्यात आली . लोक न्यायालयात मोठ्या प्रमाणात पक्षकार तसेच  वकील संघाचे सदस्य व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते .कार्यक्रमाचे संचलन अँड. एम. डी. आहेर, सचिव वकील संघ यांनी केले तर अँड. व्ही. एम. निळकंठे यांनी आभार मानले.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image
go to top