५८३ जवान जनतेच्या सेवेत रुजू

हरी तुगावकर
गुरुवार, 26 जुलै 2018

लातूर : नऊ महिन्याचे खडतर प्रशिक्षण घेवून ५८३ पोलिस जवान
जनतेच्या सेवेत आता रूजू होत आहेत. बाभळगाव (ता. लातूर) येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात गुरुवारी (ता. २६) दीक्षांत संचलनाचा दिमाखदार सोहळा झाला.

लातूर : नऊ महिन्याचे खडतर प्रशिक्षण घेवून ५८३ पोलिस जवान
जनतेच्या सेवेत आता रूजू होत आहेत. बाभळगाव (ता. लातूर) येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात गुरुवारी (ता. २६) दीक्षांत संचलनाचा दिमाखदार सोहळा झाला.

हे जवान मुंबईसह विविध ११ जिल्ह्यात काम करणार आहेत.
बाभळगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात ता. तीन आक्टोबर २०१७ ते २६ जुलै २०१८ या कालावधीत या जवानांना खडतर प्रशिक्षण देण्यात आले आहे.
केंद्राच्या सत्र क्रमांक १४ चे सर्व प्रशिक्षणार्थी होते. या सत्रात मुंबई शहरसह विविध ११ जिल्हे व आयुक्तालये यातील नवप्रविष्ठ पोलिस जवानाना हे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणात अत्याधुनिक तंत्रज्ञान, हत्यारे चलाविण्याचे प्रशिक्षण, फायरिंग, कमांडो कोर्स व कायद्याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. याचा दीक्षांत संचलन गुरुवारी झाले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत होते. तर अध्यक्षस्थानी केंद्राचे प्राचार्य डॉ. काकासाहेब डोळे होते. या सोहळ्यात परेड कमांडर आदिनाथ शिरसाट (अहमदनगर) यांनी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा चषक विकास जगदाळे (मुंबई) याने पटकावला. `सदरक्षणाय खलनिग्रहणाय` हे महाराष्ट्र पोलिसांचे बिद्रवाक्य आहे. याचे व्रत घेवून या जवानानी जनतेची सेवा करावी असे आवाहन जी. श्रीकांत यांनी केले.

प्राचार्य व अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. डोळे यांनी केंद्राच्या कामाची
माहिती दिली. केंद्राच्या परिसरात पाच हजार झाडे लावण्यात आली असून
त्याचे संवर्धन केले जात आहे. या जवानानी तळागाळातील व्यक्तीस न्याय
मिळेल असे कर्तव्य करण्याचे आवाह त्यांनी केले. यावेळी पोलिस अधिक्षक डॉ. शिवाजी राठोड, मुख्य न्यायाधिश वृशाली जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन ईटनकर, आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, निवासी उपजिल्हाधकारी डॉ. अनंत गव्हाणे, एनसीसीचे कमांडिंग आॅफीसर कर्नल एम. सिंग उपस्थित होते.

Web Title: 583 army man starts service