esakal | महसूल कर्मचाऱ्यांच्या संपात ५८३ अधिकारी कर्मचारी सहभागी 
sakal

बोलून बातमी शोधा

0agitation

परभणी जिल्ह्यात महसूल कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा रखडलेला प्रश्न मार्गी लावावा, या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी (ता.एक) पुकारण्यात आलेल्या महसूल कर्मचाऱ्यांच्या सामुहिक रजा आंदोलनास शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.

महसूल कर्मचाऱ्यांच्या संपात ५८३ अधिकारी कर्मचारी सहभागी 

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणीः महसूल कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा रखडलेला प्रश्न मार्गी लावावा, या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी (ता.एक) पुकारण्यात आलेल्या महसूल कर्मचाऱ्यांच्या सामुहिक रजा आंदोलनास शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. 

मराठवाडा विभागातील अव्वल कारकुन कर्मचाऱ्यांना नायब तहसीलदार व नायब तहसीलदार यांना तहसीलदारपदी पदोन्नती देण्याबाबत संघटनेद्वारे वारंवार मागणी करण्यात आली. त्याबाबत शासनाने कुठलाही निर्णय घेतला नाही. मागील दोन वर्षांपासून पदोन्नत्या ठप्प झालेल्या आहेत. मंत्रालय स्तरावर समन्वय साधत मराठवाडा विभागातील सर्व संवर्गास पदोन्नती द्यावी. याशिवाय फौजदारी प्रकरणातील आरोपी संशयित अधिकारी कर्मचाऱ्यांना चौकशी निर्णयाच्या अधीन राहून नैसर्गिक पदोन्नती द्यावी, यासह अन्य मागण्या आंदोलनकर्त्यांनी निवेदनाद्वारे केल्या. 

२६ अधिकारी कर्मचारी रजेवर 
गुरुवारी (ता.एक) महसूल कर्मचारी संघटनेने सामुहिक रजा आंदोलन पुकारलेल्या या आंदोलनास जिल्हाभरातून अधिकारी - कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन मोठा प्रतिसाद दिला. जिल्ह्यात महसूल यंत्रणेत गट अ गटात १६, ब संवर्गात ब गटात ३४, क गटात ५०६, ड गटात ८० अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या आहे. या आंदोलनात पूर्वपर्वानगीने एकूण २६ अधिकारी कर्मचारी रजेवर गेले आहेत. तर गुरुवारच्या संपात अ गटात नऊ, ब गटात २८, क गटात ४८८ व ड गटात ५८ असे एकूण ५८३ अधिकारी कर्मचारी सहभागी झाल्याची माहिती संघटनचे अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर यांनी दिली. 

हेही वाचा - हिंगोली : १७ लाख रुपये किमंतीचा गुटखा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जिंतूरला निवेदन 
जिंतूर ः विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सामूहिक रजा आंदोलन केले. तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा मंडळ अधिकारी, तलाठी संघटना व महसूल कर्मचारी संघटनेने निवेदन दिले. निवेदनावर तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रशांत राखे, नितीन बुड्ढे, पी.एल पाटील, बालाजी नागदे, धनंजय सोनवणे, सचिन लेनगुळे, एस.जी.होळ, व्ही.एम.बोधले, डी.डी.गायकवाड, यु.बी.वाकेकर, महसूल कर्मचारी संघटनेचे विजयकुमार घुगे, नागेश देशमुख, शेख अकबर, भारत लव्हाळे, एस.के.हिंगे, अर्जुन कांदे, पवन नागसेन, सुमेध वाघमारे, रूपाली नवगिरे, रंजित डुकरे, ज्ञानेश्वर भटकड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

हेही वाचा - दिवाळीनंतर डाळींचा तुटवडा निर्माण होण्याची भिती

पूर्णेत कर्मचाऱ्यांचे निवेदन 
पूर्णा ः पूर्णा तहसील कार्यालयांतर्गत असलेल्या दस्तावेज नोंदणी कार्यालयातील कर्मचारी (ता.एक) आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर जात असल्याबाबतचे निवेदन देण्यात आले. पूर्णा तहसील कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर तालुक्यातील व शहरातील जनतेचे दस्तावेज नोंदणी व मुद्रांक विक्री कार्यालय आहे. या कार्यालयांमध्ये एकूण चार कर्मचारी आहेत. एक ऑक्टोबर रोजी या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेल्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना दुय्यम निबंधक डी.डी. सोनटक्के, अविनाश राऊत यांनी दिले.  


संपादन ः राजन मंगरुळकर

loading image