दरोड्याच्या तयारीतील सहा जणांना अटक

प्रशांत शेटे 
मंगळवार, 5 जून 2018

चाकूर (लातूर) : दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरून थांबलेल्या हिंगोली जिल्ह्यातील सहा सराईत दरोडेखोरांना तिक्ष्ण हत्यारासह पोलिसांनी पकडले असून त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.  

येथील बसस्थानक परिसरात मंगळवारी (ता.5) मध्यरात्री तीनच्या पोलिस गस्त घालत असताना एम. एच. 38 ई. 2063 क्रमांकाचा महिंद्रा टेम्पो संशयीतरित्या थांबलेला दिसून आला.

पोलिसांनी यातील व्यक्तीची चौकशी करून टेम्पोची तपासणी केली असता एक बनावट बंदुक, तलवार, कट्यार आदी तिक्ष हत्यार आढळून आले. दरोडा टाकण्याच्या उद्देशाने हे दरोडेखोर शहरात आले असल्याकारणावरून पोलिसांनी त्यांना अटक केली. करतारसिंग हत्यारसिंग टाक (वय 19), बबलु उर्फ हनुमानसिंग हत्यारसिंग टाक (वय 23), अजयसिंग हत्यारसिंग टाक (वय 21) गोपिनाथ मारोती पवार (वय 22), अजय रमेश पवार (वय 21) संतोष पांडुरंग पतंगे (वय 21) रा. सर्व इंदिरानंदर कळमनुरी जि. हिंगोली या सहा जणांना अटक करण्यात आले अाहे.

पोलिस हवालदार सुभाष हरणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक रामेश्वर तट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक केनेकर करीत आहेत.   

Web Title: 6 arrested who are trying to robbery

टॅग्स