भावाच्या खूनप्रकरणी कुटुंबातील 6 जणांना जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

उमरगा - सामायिक विहिरीच्या पाण्यावरून सख्ख्या भावाचा खून केल्याप्रकरणी दाबका (ता. उमरगा) येथील कुटुंबातील सहा जणांना अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी (ता. 14) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पाण्याच्या वादात माणिक सातप्पा जमादार याचा मनोहर सातप्पा जमादार व कुटुंबीयांनी मारहाण करून खून केला होता. या प्रकरणी लक्ष्मी माणिक जमादार यांनी फिर्याद दाखल केली होती.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. साळुंके यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. तत्कालीन शासकीय अभियोक्ता व्ही. एस. आळंगे यांनी तीन तर अतिरिक्त शासकीय अभियोक्ता संदीप देशपांडे यांनी पाच साक्षीदार तपासले. पुरावा, देशपांडे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून मनोहर जमादार, विमलबाई जमादार, दत्ता जमादार, बालाजी जमादार, दिंगबर जमादार, अनुसया घाटे यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली लक्ष्मीबाई यांच्या वतीने ऍड. व्ही. एस. आळंगे यांनी काम पाहिले.

Web Title: 6 people Life imprisonment punishment in murder case